कुंबेफळ शिवारातील दुर्देवी घटना
पाचोड । वार्ताहर
शेंद्रा एमआयडीसी कंपनीतील काम आटोपल्यानंतर घरी जाण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या तरुणांच्या दुचाकीचा रस्त्यावरच्या अंधरामुळे अंदाच चुकल्याने दुचाकी सरळ एका पन्नास फुट खोल असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली.या दुर्घटनेत एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना औरंगाबाद जालना रस्त्यावरील करमाड पोलीस ठाणे कार्यक्षेञातंर्गत कुंबेफळ शिवारात रविवारी ता.5 मध्यराञीच्या सुमारास घडली. शुभम बबनराव यादव वय (22) असे मृताचे नाव आहे.तर गणेश दादाराव पवार वय (21) हा गंभीर जखमी आहे.हे दोन्ही तरुण चित्तेपिंपळगाव ता.जि.औरंगाबाद येथील रहिवासी आहे.
या अपघाता विषयी अधिक माहिती अशी की, मृत शुभम आणि त्याचा मित्र गणेश हे दोघेही एकाच गावातील व एकाच कंपनीत कामाला होते.रात्री कंपनीची शिफ्ट संपल्यावर दोघेही (एम.एच.20 डी.एल.6272) या दुचाकीवरून घरी चित्तेपिंपळ गाव येथे येत असताना मौजे कुंभेफळ शिवारातील एका वळणावर येताच अंधारामुळे मोरील रस्त्यावरचा अंदाज न आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावरून शेतात गेली सुमारे 25 फूट अंतरावर असलेल्या 50 फुटी खोल विहिरीत दुचाकीसह दोघे पडले.या दुर्घटनेत शुभंमचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर गणेश बेशुद्ध झाला होता. बराचवेळ झाल्यानंतर एका शेतकर्यांनी दोघांना विहिरीत पाहिले.व या घटनेची पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.औरंगाबाद येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत विहिरीत उतरत शर्थीचे प्रयत्न करुन गणेशचे प्राण वाचविले. मात्र शुभमला वाचविण्यात यश मिळाले नाही दुचाकी आणि शुभमचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी कारमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस करीत आहेत.
रात्रेचे जाणे जिवावर बेतले
राञीच्या सुमारास मित्रा सोबत कामावरुन परतत असतांना दुचाकी खोलवर विहिरीमध्ये कोसळून दुर्देवी घटनेत शुभम यादवचा मृत्यू झाला. तर त्याचा मिञ गंभीर जखमी झाला.मयत शुभमचे काही वर्षापूर्वीच लग्न झाले होते.लहानपणीच वडिलांचे छञ गमावलेल्या शुभमच्या पश्चात पत्नी,आई,दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेबद्दल सर्वञ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Leave a comment