औरंगाबाद । वार्ताहर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कोविड संशोधन केंद्रास ’आयसीएमआर’ची अंतिम मंजुरी प्राप्त झाली आहे. टेस्टींग सोबतच या आजाराचे संशोधनही केंद्रात तातडीने सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी दिली. औरंगाबाद शहरात पूर्ण रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॅब केव्हा सुरू होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या संदर्भात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर यांच्यावतीने मंजुरी देण्यात आल्याचे पत्र शुक्रवारी प्राप्त झाले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (खउचठ) यांच्यावतीने ’ ’एम्स’ला कोरिना टेस्टिंग लॅब सुरू करण्यास मान्यता देणेबाबतचे अधिकार देण्यात आले आहेत.
लॅबचे संचालक डॉ गुलाब खेडकर व सहकारी लॅबसाठी कार्यरत आहेत. यासाठी आवश्यक ती तयारी करून मान्यता मिळण्यासाठी विद्यापीठाने पाठपुरावा केला. ’एम्स’च्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ मीना मिश्रा व सहकार्यांनी विद्यापीठातील लॅबसाठी उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, यंत्रसामुग्री या संबंधीची संपूर्ण पाहणी करून अहवाल सादर केला. त्यानंतर स्वॅब टेस्टिंग सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. या संशोधन केंद्रास लवकरच ’नॅशनल अॅक्रीडिटेशन बोर्ड फॉर टेस्टींग अॅण्ड कॅलीब्रेशन लॅबोरेटरीज’ यांच्यावतीने अधिस्वीकृतीचे पत्रही मिळणार आहे. या केंद्रात अगोदरच ट्रायल स्वॅब टेस्टिंग’चे काम सुरु करण्यात आलेली आहे, आता आयएमसीआरची मान्यता मिळाल्याने हे काम गतीने होणार आहे.
Leave a comment