विविध विषयांवर चर्चा.....
सोयगाव । वार्ताहर
औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक महिलाच्या प्रश्नी नेहमीच तत्पर असणार्या श्रीमती मा. मोक्षदा पाटील यांनी दि.1 बुधवार रोजी सोयगाव पोलीस स्टेशनला भेट दिली. सोयगाव शहरात कोविड-19 या जागतिक महामारीचा आढावा घ्यायला सोयगाव पोलीस स्टेशनला आल्या होत्या.
त्यांनी सोयगावतील जनतेच्या या आजारा विषयी जागृतीचे कौतुक केले.नगरपंचायत,पोलीस विभाग,आरोग्य विभाग, महसूल विभाग याच्या संयुक्त प्रयत्नाने व जनतेच्या खबरदारीने शहर आजपर्यंत कोरोना मुक्त राहिले आहे, भविष्यात देखील अशीच खबरदारी सर्वांनी घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. शहरातील परिस्थिती त्यांनी चर्चेतून जाणून घेतली. सदरील चर्चेस सोयगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष कैलास दादा काळे, सहा.पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, मंगेश सोहनी, सुनील ठोंबरे व सोयगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार संजय शहापुरकर उपस्थित होते.
 
                               ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment