औरंगाबाद । वार्ताहर
कोरोना विषाणूंच्या संसर्गाच्या महामारीने सर्वत्र थैमान घातले असून कोरोना आरोग्य, पोलीस आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा आपापल्या माध्यमातून लढा देत आहेत. स्वतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कळकळीची विनंती करून सरकारच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहेत. असे असतानाही असताना बजाजनगर -वाळूज परिसरात आरोग्य उपकेंद्रात चीड आणणारा प्रकार अलीकडेच घडला आहे.
पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह व निगेटिव्ह असणाछया व्यक्तींना पॉझिटिव्ह ठरविण्याचा प्रकार घडला आहे. त्याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. कर्तव्यात कसूर करून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरणाछया कर्मचाछयांना कार्यमुक्त करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ई-मेल द्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात पवार यांनी म्हटले आहे की, पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह ठरविण्यात आले आहे. त्यांच्या मुक्त संचारामुळे इतरांना लागण झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बजाजनगर परिसरामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात सर्वाधिक संख्येने नवे बाधित रूग्ण आढळून येत आहेत. या परिसरात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन योग्य त्या उपायोजना करत आहे; परंतु अशा आरोग्य सेवेतील काहींच्या हलगर्जीपणा करणाछया प्रवृत्तीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. याची गंभीर दखल घेऊन त्या आरोग्य केंद्रातील कर्मचाछयांना कार्यमुक्त करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गणेश पवार यांनी केली आहे.
Leave a comment