औरंगाबाद । वार्ताहर
मजुरी करणार्या एका सामान्य माणसाने 38 हजार रुपयांचा सापडलेला महागडा मोबाईल जिन्सी पोलीस ठाणे येथे जमा करून प्रामाणिकपणा दाखवला आहे. एकीकडे लॉकडाउनच्या काळात मजुरांच्या हाताला काम नाही. आर्थिक विवंचनेत कसा बसा कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अशा बिकट समयी जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मजुराने प्रमाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे.
घडले असे की, अमोल सोनवणे यांचा 38 हजार रुपयांचा मोबाईल बाबा पेट्रोल पंप येथे हरवला होता. तो मोबाईल अलीम शेख यांना सापडला. त्यांनी प्रमानिकपणा दाखवत तो जिन्सी पोलीस ठाण्यात जमा केला. पोलिसांनी मोबाईलचे मूळ मालक अमोल सोनवणे यांचा शोध घेऊन मोबाईल परत केला. अलीम शेख यांचा प्रामाणिकपणा पाहून अमोल यांनी त्यांना 5 हजार रुपये रोख बक्षीस दिले.
Leave a comment