औरंगाबाद । वार्ताहर

जुने फ्रिज, वॉशिंग मशीन ओएलएक्सवर विक्रीस काढणार्‍या उच्चशिक्षित तरुणाची 24 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर क्रांती चौक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील कंपनीत सीनियर वेब अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅनालिस्ट असलेले हर्षल देशमुख (वय 36, समर्थनगर, औरंगाबाद) लॉकडाऊन लागल्यानंतर मार्चमध्ये शहरात परतले. नंतर त्यांची बंगळुरूला बदली झाली. त्यामुळे मुंबईच्या घरातील काही साहित्य विकण्याचा त्यांनी निर्णय घेतला.  वॉशिंग मशीन, फ्रिजचे छायाचित्र त्यांनी ओएलएक्स या संकेतस्थळावर टाकले. 30 जून रोजी मोंटू शर्मा नाव सांगणार्‍या व्यक्तीने त्यांना कॉल केला. वॉशिंग मशीन घेण्याची तयारी दाखवली. पण ऑनलाइन व्यवहार करताना हर्षल यांना पैसे पाठवण्याऐवजी त्याने हर्षल यांच्याच बँक खात्यातील 24 हजार रुपये वळते करुन घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर हर्षल यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस तपास करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.