औरंगाबाद । वार्ताहर
महावितरण कंपनी आणि महापारेषण कंपनीतील तांत्रिक कामगारांच्या आर्थिक गरजा भागविणारी मराठवाड्यातील अग्रगण्य पतसंस्था महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित मराठवाडा औरंगाबाद या पतसंस्थेचे वरिष्ठ लिपिक श्री शेख दिलदार हे 24 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज दिनांक 30 जून 2820 रोजी सेवानिवृत्त झाले.
तसेच संस्थेच्या खडकेश्वर येथील कार्यालयांमध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन हे होते. व्यासपीठावर संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष ताराचंद कोल्हे मामा, उपसरचिटणीस आर पी थोरात ,माजी केंद्रीय अध्यक्ष प्रभाकर लोखंडे ,राज्य उपसरचिटणीस एस.आय. सय्यद, पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास गौरकर, उपाध्यक्ष जयसंतोष आहेर, सचिव विश्वंभर लोखंडे, संचालक श्रावण कोळनूरकर, प्रकाश सोरमारे, गिरजाराम लोखंडे, श्रीमती सलमा नाहिद शेख, सौ सीमा मोहिते, व सत्कार मुर्ती शेख दिलदार सपत्नीक उपस्थित होते. याप्रसंगी पतसंस्थेचे माजी सचिव शिवाजीराव चव्हाण माजी उपाध्यक्ष बी.एस. वाघमारे, पुंडलिकराव चव्हाण, यांच्या सह पतसंस्थेच्या सभासद उपस्थित होते. कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टंसिंग ठेवत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
शेख दिलदार यांना सेवानिवृत्तीनिमित्त पतसंस्थेच्या वतीने शाल,ड्रेस व साडीसह सपत्नीक सत्कार करून एक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी शेख दिलदार यांचा सर्व उपस्थितांनी वैयक्तिकरित्या सत्कार करून त्यांना निरोप दिला. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या व पतसंस्थेच्या सुरवातीच्या काळापासून शेख दिलदार हे संघटनेच्या भरभराटीसाठी अथक परिश्रम घेतले पतसंस्थेच्या कार्यामध्ये असल्यामुळे पतसंस्थेच्या सद्य आर्थिक उन्नती मध्ये त्यांच्या कामाचा सिंहाचा वाटा असल्याच्या भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. शेख दिलदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अत्यंत भावुक होऊन त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा करून दिला. पतसंस्थेचे कर्मचारी श्री एम आर. काळे,नंदू लोखंडे, मनोज चव्हाण यांच्या वतीने श्री शेख दिलदार यांना शाल,भेटवस्तू पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व उपस्थितांना पतसंस्थेच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री.विश्वंभर लोखंडे यांनी केले तर आभार पतसंस्थेचे अध्यक्ष श्री कैलास गौरकर यांनी मानले.
Leave a comment