भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूनांच बाजारात परवानगी
फर्दापूर । वार्ताहर
कोव्हीड 19 विषाणू संसर्गाचे रुग्ण ग्रामीण भागात ही आढळून येत असल्याचे दिसून येत असल्याने सावधगिरीची भूमिका म्हणून फर्दापूर ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाने दर गुरुवारी गावात भरणारा भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंचा आठवडी बाजार गावा बाहेर हलवून एका मोकळ्या मैदानात सोशल डिस्टन्स राखत भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांन साठी जागा उपलब्ध करुन देत दक्षता बाळगली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कोव्हीड 19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून फर्दापूर (ता.सोयगाव) येथील आठवडी बाजार बंद करण्यात आला होता मात्र लॉक डाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर येथील हनुमान मंदिर परीसरात दर गुरुवारी काही प्रमाणात आठवडी बाजार भरायला सुरुवात झाली होती दरम्यानच्या कालावधीत कोव्हीड 19 विषाणू संसर्ग ग्रामीण भागात ही होत असल्याची बाब उघड झाल्याने फर्दापूर ग्रामपंचायतीने दक्षतेची भूमिका घेत येथील हनुमान मंदिर परीसरात भरणारा आठवडी बाजार ही रद्द करण्याचा निर्णय घेऊन या बाबत ची माहिती फर्दापूर पोलिसांना ही कळविली होती याच पार्श्वभूमीवर दि.2 गुरुवार रोजी ग्रामविकास अधिकारी सुनिल मंगरुळे साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे उपसरपंच शेख सत्तार ग्रा.पं सदस्य फिरोज पठाण, विलास वराडे, रविंद्र बावस्कर, शेख इस्माईल, भीमराव बोराडे पो.पा शिवाजी बावस्कर तंटामुक्ती अध्यक्ष मुक्तार शेख, सुरेश शेळके, गणेश वेल्हाळकर आदींच्या पथकाने हनुमान मंदिर परीसरात भेट देवून येथील आठवडी बाजार रद्द करण्यात आल्याचे सांगून व्यापार्यांची समजूत काढली मात्र यावेळी गावातील नागरिकांनी भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाना लावू देण्याची मागणी लावून धरल्याने ग्रामविकास अधिकारी सुनिल मंगरुळे साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे यांच्या पथकाने येथील राजीव गांधी नगर जवळील मोकळ्या मैदानात सोशल डिस्टन्स राखुन भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना जागा उपलब्ध करुन देत सदरील बाजार गावा बाहेर हलवून सावधगिरी बाळगली असून या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन होण्यासाठी पोलिस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला होता.
Leave a comment