औरंगाबाद । वार्ताहर
ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे समाजात स्त्री-पुरूष असमानता (लिंगभेद) दुर करण्यासाठी सुलभ खेळांच्या माध्यमांतुन व्यापक माहितीसह अभिन्न नावाचा उपक्रम जिल्हयातील विविध शाळा, महाविद्यालये, याठिकाणी सातत्याने हा उपक्रम राबविला जात आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या उपक्रमांच्या माध्यमांतुन शालेय व महाविद्यालयीन तरूण- तरुणी यांना सोप्या व सरळ अशा खेळयांच्या साहय्याने स्त्री व पुरुष यातील भेदभावा बाबत व्यापक माहितीसह यातुन तरूणाई पुढे सकारात्मक संदेश प्रस्तुत करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. यामुळे महिला/तरूणी यांच्या प्रती घडणा-या अत्याचार व छेडछाडींच्या घटना तसेच कौटोंबिक अत्याचारांचे गुन्हे याद्वारे कमी होण्यास मदत होईल.
सध्या कोरोना संसर्गाचे पार्श्वभुमीवर अभिन्न हा उपक्रम जनसामान्य पर्यंत पोहचविण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय टेंडर केअर होम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने एका वेबिनारचे आयोजन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने आज 03 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होणार्या या वेबिनारमध्ये मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक हया विद्यार्थ्यांना स्त्री -पुरूष समानता या विषयावर संवाद साधुन मार्गदर्शन करणार आहेत. या संवादामध्ये पुढील लिंकचा वापर करून हींींिी:/र्र्/ूेीींी.लश/रशक्षि
Leave a comment