औरंगाबाद । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. अशातच काही जण जिल्हाधिकारी यांच्या नावाने फेक मॅसेज तयार करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी सांगितले आहे.
औरंगाबाद कलेक्टरकडून सूचना, लवकरच आपण कोरोनाच्या तिसर्या स्टेजला पोहचू. चिकन, मटण बंद, शेजारी पाजारी बंद, ब्रेड पाव बेकरी बंद, अशा आशयाचा एक मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी स्पष्ट केले की, असा कोणताही निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतलेला नाही, हा फेक मॅसेज आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच शेयरही करू नये. असे त्यांनी म्हटले आहे.
Leave a comment