औरंगाबाद । वार्ताहर
शहरात दररोज 200 ने कोरोनाबाधितांचा संख्या वाढत आहे. त्यामुळे वारंवार पोलीस प्रशासनावर होत असलेली टीका याला गांभीर्याने घेत आज क्रांती चौक पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बाजारपेठेतील बेजबाबदारपणे वागणार्या दुकानदार व कामगारांना पोलिसांनी अटक केली आहे. तोंडाला मास्क न लावता व बाजारपेठेत प्रादुर्भाव वाढेल याची काळजी न घेता काम करणार्या दुकानदार व कामगार लोकांना क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी व त्यांच्या पथकाने अटक केली.
त्या नंतर पोलीस स्टेशनला हजर करून तंबी देत नावे लिहून सोडून देण्यात आले. तत्पूर्वी क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी उचलून आणलेल्या दुकानदार व कामगार यांना कोरोनाचा गांभीर्य लक्ष्यात घ्या. स्वतःसाठी नाही तर तुमच्या घरच्या लोकांच्या आरोग्यासाठी मास्क वापरा जर तुम्हला इथून पुढे ही व्यापार सुरू ठेवायचा असेल तर काळजी घ्या. नाही तर प्रशासनाला पुन्हा एकदा कडक लोकडाऊन करावे लागेल, असा इशारा दिला.
Leave a comment