औरंगाबाद । वार्ताहर
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी वाळूज येथील बजाज कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी यूट्यूबवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी बजाज कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकार्यांना आदेश देवून कंपनी बंद करावी, अशी विनंती हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.
जाधव म्हणाले की, औरंगाबाद येथील बजाज कंपनीत जवळपास 140 कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. श्रीमंतांची खळगी भरण्यासाठी प्रशासन किती लाचार झालंय हे आता त्यातून दिसतंय. बजाजचे खिशे भरण्यासाठी कर्मचार्यांचा जीव धोक्यात टाकणं हे भयंकर आहे. मी प्रशासनाचा निषेध करतो. भारत सरकारच्या 18 मे 2020 रोजीच्या जीआरनुसार कलम 6 अंतर्गत दोन पेक्षा अधिक रुग्ण एखाद्या कंपनीत आढळले, तर अशा कंपनीला ताबोडतोब बंद करुन 48 तासात सॅनेटाईज केलं पाहिजे. बजाज कंपनीत 140 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तरीही कंपनी चालू आहे. लोकं मेले तरी चालतील. पण बजाजला कुणी हात लावायचा नाही.
Leave a comment