संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर संस्थान सिल्लोड चा सामाजिक उपक्रम
सिल्लोड । वार्ताहर
कोरोना च्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशी च्या पावन दिनी संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर संस्थान सिल्लोड येथे आज सकाळी मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत सोशल डिस्टनसिंग चे पालन करून विठ्ठल रखुमाई ची विधिवत पूजा करण्यात आली.
काकड आरती व भाजनानंतर सामाजिक उपक्रम म्हणून मंदिर परिसरात 101 झाडांची लागवड श्री नंदकिशोर सहारे ,गटनेता नगरपरिषद सिल्लोड, डॉ निलेश मिरकर अध्यक्ष धन्वंतरी डॉक्टर्स असोसिएशन सिल्लोड यांच्या हस्ते करण्यात आली.यामध्ये वड ,पिंपळ, साग, आंबा यासारख्या विविध वृक्षाच्या रोपांची लागवड करण्यात आली. सदरील कार्यक्रमात हभप कापरसिंग दादा वान्जोलेकर, हभप मनोज महाराज भाग्यवंत,ज्ञानेश्वर महाराज काकडे,शिवाजी महाराज वाघ,ओंकार गुरुजी शिंदे,रवींद्र महाराज राजहंस,नारायण महाराज हाडोळे,दत्ता महाराज बोराडे,देविदास महाराज बोराडे,बाजीराव दादा साळवे, अर्जुन भाग्यावंत यांनी सहकार्य केले .
Leave a comment