अनीता पा.वानखेडे यांची शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

औरंगाबाद । वार्ताहर

महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या आमदार निवडीसाठी निवडणुक होत आहे.त्यात आपल्या राष्ट्रवादीकडे चार जागा आहेत. या जागेवर विशेषकरुन विधानसभेप्रमानेच या ही निवडणुकीत मुख्यत्वे महिलांचे नाव दैनिक असो वा कुठल्याही नेत्यांच्या तोंडुन नावे पुढे येतांना दिसत नाहीय.आपण महिलांना या पक्षात मानाचे स्थान देऊन पन्नास टक्के आरक्षण दिलेले आहे ,याचाच विचार करुन व आपले पुरोगामी विचार म्हणुन मी या पक्षात पाय रोऊन ताठ मानेने उभी आहे. ज्याप्रमाने अहिल्यादेवी होळकर हे नाव देशाच्या इतिहासात अमर झाले ते त्यांच्या चाणाक्ष व सुधारणवादी,कर्तृत्ववान कार्यक्षम राज्यकर्ती म्हणुन त्यांनी आपले राज्य स्वत:च्या बळावर चालवले. ‘बाई काय राज्यकारभार करणार’ ही दरबारी अटकळ अहिल्यादेवींनी सपशेल खोटी ठरवत त्यांनी देशाच्या इतिहासात एक कार्यक्षम चाणाक्ष महिला म्हणुन कोरले ते त्यांच्या कर्तृत्वाने.अगदी त्याच अहील्यादेवी ज्यांच्यावर त्यांचे सासरे मल्हारराव होळकरांनी जबाबदारी देऊन अहिल्यादेवींनी राज्यकारभार सांभाळला. त्याप्रमाणे एक संधी म्हणुन आपण न्याय द्यावा . एक सक्षम महिला म्हणुन या पदावर आपण एका महिलेचा विचार करावा.

या निवेदनात असे नमूद केले आहे की, एका शेतकरी कुटुंबात जन्मलेली महिला असून मी अंतरराष्ट्रीय मानवी आयोग असोसिएशनच्या अधिपत्याखाली महिला बालकल्याण, सामाजिक, व शेतकीय क्षेत्रात भरीव कामगरी केलेली महिला आहे व मा. राज्यपाल यांच्या मार्फत विधानपरिषदेवर तज्ज्ञ लोकापैकी आवश्यकतेनुसार विधानपरिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त केले जातात.तसेच मी कोणत्याही राजकीय पक्षाची पदाधिकारी किंवा कार्यकर्ती नसून एक समाजसेवक आहे आणि सामाजिक बांधीलकी म्हणून मी महिला व बाल कल्याण क्षेत्रात तसेच शेतीची प्रगतीमध्ये बचत गटच्या माध्यमाने तसेच आंतरराष्ट्रीय मानव आयोग असोसिएशनची प्रदेश कार्याध्यक्ष महिला या नात्याने महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या विविध योजना महिला व शेतकरी यांच्यापर्यंत पोहचवून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून घेऊन महिलांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी व शेतकर्‍यांना स्वावलंबी बनवून शेतीची प्रगती करण्यासाठी तसेच बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण देऊन मोलाची कामगरी बजावलेली आहे. मला सामाजिक, शेती विषयक कामाचा चांगला अनुभव असल्याने मी एक तज्ज्ञ महिला या नात्याने मला विधानपरिषदेवर मा. राज्यपाल यांचे मार्फत नियुक्त केल्या जाणार्‍या सदस्यामधून एक सदस्य म्हणून माझी नियुक्ती करावी, सध्या कोरोनाचा प्रकोप जास्त असल्याने व माझा औरंगाबाद जिल्हा त्यात प्रभावित असल्याने मला पोस्टामार्फत किंवा कुरीयर मार्फत माझे पुराव्यानिशी सविस्तर निवेदन पाठविणे किंवा प्रत्यक्षात मुंबईला येऊन दाखल करणे शक्य होणार नाही, म्हणून सध्या सदरचा अर्ज आपल्या सेवेत पाठविले. असून येत्या आठ दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर मी प्रत्यक्ष हजर होऊन माझी फाईल दाखल करणार आहे. माझी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करून मला विधानपरिषदेत तज्ज्ञ व्यक्ती म्हणून काम करण्याची संधी द्यावी. अशी मागणी अनिता वानखडे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्र पवार तसेच  उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना निवेदना द्वारे केली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.