शेतकर्यांचे मोठे नुकसान, वाहनधारकांना करावे लागते तारेवरची कसरत
सोयगाव । वार्ताहर
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा ते देव्हारी, बुलढाणा जाण्यासाठी मुख्य मार्गावर असलेल्या अरुंद रोड त्यामधे त्याला खोल डाब व मोठमोठे खड्डे असून पावशाच्या पाणी शेतात घुसल्याने रस्ता शेजारी जमीन असलेल्या शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्य रस्ता असल्याने व शेतापासून एक कि.मी.अंतरावर कोलते (पाटील) पेट्रोल पंप आहे येणार्या व जाणार्या प्रत्येक वाहनधारकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी याकडे लक्ष दयावे अशी होत आहे.
सावळदबारा ते देव्हारी रस्त्यावर असलेल्या या अरुंद पुलाजवळ अजाबराव साहेबराव चव्हाण गट नंबर 104 जमीन आहे. आजूक रस्त्याच्या आजूबाजूला शेतकरी डॉ.जफर सय्यद, शालिकराम बावणे,या शेतकर्यांच्या जमीनी आहेत सोमवारी सकाळी व रात्री या परिसरात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अरुंद रस्त्यावर दोन ते तीन फुट पाणी आहे. रस्त्याच्या साईड पट्ट्या नसल्याने पावशाचे पाणी रस्त्यावर व सदरील शेतकरी अजाबराव चव्हाण यांच्या शेतात पाणी घुसल्याने या शेतकर्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे. प्रत्येक पावसाळ्यात या शेतकर्यांचे नुकसान होत असते परंतु संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकार्यांना याकडे लक्ष देण्यात यावे.जर सदरील रस्त्याचे पाणी साईड पट्ट्या खोलीकरण करून समोरच्या नाल्यात सोडले तर आणि रस्त्याची उंची वाढवली तर दरवेळी या शेतकर्यांचे नुकसान होणार नाही व वाहनधारकानां त्रास पण होणार नाही अशी मागणी शेतकरी अजाबराव चव्हाण, वाहनधारक व शेतकरी करीत आहे.
Leave a comment