हत्या की आत्महत्या नागरिकात संभ्रम
पैठण /प्रतिनिधी :-
येथील पैठण औद्योगिक वसाहत परिसरातील अंजता फार्मा लि.या औषधी निर्माण कंपनीत कामगार नेते असणा-या ४५ वर्षीय कामगाराने कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना बुधवार रोजी सांयकाळी घडली
वैजिनाथ पंडितराव काळे रा शैलजानगर मुधलवाडी असे मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव असून हत्या की आत्महत्या याबाबत नागरिकात संभ्रम निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे
या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार,दि.१ रोजी एमआयडीसी पैठण परिसरातील अंजता फार्मा कंपनी मधील वैजिनाथ पंडीतराव काळे वय -४५ वर्ष हे आज सकाळी ७ वाजेच्या शिफ्टसाठी कंपनीत आले असता.त्यांनी कंपनीतच मेनंटनंस विभागाच्या वरच्या रुममध्ये गळफास घेतला.हि घटना सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.कंपनी व्यवस्थापनाने या बाबत घडलेली घटना एमआयडीसी पैठण पोलिस ठाणेला दिली.पोलिस कर्मचाऱ्यांनी मृतदेह पैठण येथील शासकीय रुगण्लयात दाखल केला असुन.आज गुरुवार रोजी सकाळी शविच्छेदन करण्यात येणार असुन. मात्र मृत्यूचे सक्षम कारण आद्यापही समजले नाही पुढील तपास एमआयडीसी पैठण पोलिस करीत आहे.
Leave a comment