पैठण । वार्ताहर
पंढरीनाथाच्या दर्शनासाठी मंगळवारी सकाळी पैठणहून राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने शांतीब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा पंढरीकडे रवाना झाला.
टाळ मृदुंगाच्या निनाद व हरी नामाचा गजर करत हभप रघूनाथ महाराज गोसावी- पांडव - पालखीवाले यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने परवानगी दिलेले मोजक्या वारकर्यांसह या सोहळ्याने पंढरपूर कडे प्रस्थान ठेवले.
राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री नामदार संदिपान भुमरे, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलिस निरीक्षक भगिरथ देशमुख, नगर परिषद मुख्याधिकारी सोमनाथ पाटील जाधव, पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्करतात्या कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ विजयकुमार वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे प्रपाठक डॉ रुषीकेश खाडीलकर यांनी मार्गस्थ झालेल्या या पालखी सोहळ्याला निरोप व शुभेच्छा दिल्या. पंढरीनाथ व एकनाथांच्या भेटीनंतर हा पालखी सोहळा बस मधूनच पैठणला परतणार असल्याचे जनसंपर्क अधिकारी नामदेवराव खराद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
Leave a comment