औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2741 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज 72 जणांना सुटी दिलेल्या मनपा हद्दीतील 71, ग्रामीण भागातील 03 जणांचा यात समावेश आहे. आज एकूण 282 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 219, ग्रामीण भागातील 63 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये 165 पुरूष, 117 महिला आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 5565 कोरोनाबाधित आढळले आहेत, तर 263 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 2561 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. सायंकाळी आढळलेल्या 30 रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) असून त्यात 14 पुरूष आणि 16 महिलांचा समावेश आहे.
औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (28)
खोकडपुरा (1), देवळाई चौक (1), कटकट गेट (1), साई नगर (1), रायगड नगर (1), शिवशंकर कॉलनी (2), उत्तम नगर (2), दिल्ली गेट (1), हर्ष नगर (1), रमा नगर, क्रांती चौक (1), छावणी परिसर, मिलिंद महाविद्यालयाजवळ (1), अजब नगर (1), सिल्लेखाना चौक (1), हुसेन नगर, बीड बायपास (1), घाटी परिसर (4), मिटमिटा (1) दिल्ली गेट (2), आरेफ कॉलनी (1), शिवाजी नगर (3), अन्य (1)
ग्रामीण भागातील रुग्ण (2)
फर्श मोहल्ला, खुलताबाद (1), रांजणगाव, शेणपुजी, बजाज नगर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) 29 जून रोजी औरंगाबाद शहरातील रोकडा हनुमान कॉलनीतील 58 वर्षीय पुरूष, बुड्डीलेनमधील 44 वर्षीय स्त्री, रेल्वे स्टेशन परिसरातील राहुल नगरमधील 71 वर्षीय स्त्री, फुलंब्रीतील फतेह मैदान येथील 62 वर्षीय या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत 204 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 200 रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते. त्यामुळे आतापर्यंत घाटीत औरंगाबाद जिल्ह्यातील 200, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये 62, मिनी घाटीमध्ये 01 अशा एकूण 263 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
Leave a comment