भराड़ी । वार्ताहर
मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे वसई शिवारातील गट नंबर 185 मधील शेतकरी भिमराव भागाजी लहाने यांच्या शेतातील मातीबांध सांडव्यासह फुटून सहा एकर वरील विहिरीसह शेतजमीन वाहून गेली असता राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सूचनेवरुन वेळीच लक्ष केंद्रित करीत जेसीबीच्या साह्याने मातीबांध सांडवा दुरुस्ती तसेच विहिर दुरुस्ती काम हाती घेण्यात आले. सिल्लोड तालुक्यातील सराटी, बोदवड, वसई,पिंपळदरी परिसरात गुरुवारी (दि 11) चांगलेच थैमान घातले असता अतिवृष्टीमुळे परिसरातील अनेक हेक्टर वरिल ठिबक संच- बियाण्यांसह अनेक विहिरी जमीनदोस्त झाल्या असुन शेतजमीनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते .
अतिवृष्टीमुळे मातीबांध-सिमेंट बांध-बंधा-यांसह ठिक ठिकाणी नाले फुटल्याने शेतक-यांचे खुपच नुकसान झाले आहे. मतदारसंघात अनेक गावांना भेटी देत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसाग्रस्त भागाची पाहणी करीत अधिकार्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना देऊन नुकसाग्रस्त शेतक-यांना लवकरच नुकसान भरपाई देण्यात येईल असे सांगितले. सिल्लोड तालुक्यातील वसई शिवारातील गट नंबर 185 मधील शेतकरी भिमराव भागाजी लहाने यांच्या शेतातील मातीबांध सांडवा फुटल्याने सहा एकर वरील विहिरीसह शेतजमीन वाहून गेली असता राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सूचनेवरुन वेळीच लक्ष केंद्रित करुन मातीबांध सांडवा दुरुस्ती तसेच विहिर दुरुस्तीचे काम हाती घेऊन पुढील पडणार असलेल्या पावसामुळे शेतजमीनीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी जेसीबीच्या साह्याने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
Leave a comment