सिल्लोड । वार्ताहर
सिल्लोड शहरात नागरिक व व्यापारी बांधवानी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंस्फूर्तीने 22, 23 व 24 जून असे तीन दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र शहर तीन दिवस बंद असल्याने हातावर पोट भरणार्या कुटुंबाना आधार देण्यासाठी नेहमी प्रमाणे ना. अब्दुल सत्तार पुढे आले. सिल्लोड शहरात तीन दिवसातील बंद काळात हातावर पोट भरणार्या गरजूंना ना. अब्दुल सत्तार यांच्या सुचनेने शिवसेनेच्या वतीने अन्नधान्य व किराणा किट चे वाटप करण्यात आले. शहरातील एकता नगर , इंदिरा नगर, माऊली नगर, दुर्गा नगर, जैनोद्यीन कॉलनी इदगाह परिसर अशा विविध भागांत शिवसेनेच्या वतीने मदत वाटप करण्यात आली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, नगराध्यक्षा राजश्री निकम, निराधार योजनेचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, नॅशनल एज्युकेशन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रईस खान, नगरसेवक सत्तार हुसेन,राजू गौर, रईस मुजावर, शकुंतलाबाई बन्सोड, शेख बाबर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, शिवसेना तालुका उपप्रमुख रघुनाथ घरमोडे, शिवा टोम्पे, फहीम पठाण, मुश्ताक देशमुख ,गौरव सहारे, दिपक सेट अग्रवाल,दिपक गायकवाड आदींची उपस्थिती होती .
Leave a comment