एकाच वैद्यकीय अधिकार्यावर ग्रामीण रुग्णालयाचा भार
सोयगाव । वार्ताहर
सोयगाव ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी पद्धतीवर भरण्यात आलेरल्या अधिकारी व कर्मचार्यांचा करार संपल्याने सोयगाव ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदांची कीड लागली असून वैद्यकीय अधीक्षक यांची आलेली सेवानिवृत्ती आणि दि.25 व दि.26 दोन अधिपारीचारक यांचा संपणारा सेवाकाळ यामुळे एकाच वैद्यकीय अधिकार्यावर सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार असणार आहे.
एक लाख नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करणार्या सोयगाव ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर पदांची भरती करण्यात आलेली आहे.यामध्ये याच महिन्यात वैद्यकीय अधिकारी डॉ.शिल्पा देशमुख यांचा अभ्यासक्रमाला नंबर लागल्याने त्यांनी तातडीने सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला सोडचिठ्ठी दिली आहे.अधिपरिचारिका किरण पवार,अयोध्या ठोंबरे यांचा करार संपल्याने त्यांनी रुग्णालय सोडले असून आज साईनाथ जाधव आणि दि.26 दैवशाला पायगव्हान या दोघांचा करार संपणार आहे.सोयगाव रुग्णालयात अठरा महिन्याच्या करारावर अधिकापारीचारक आणि 11 महिन्यांच्या करारावर वैद्यकीय अधिकारी यांची भरलेल्या पदांचा कार्यकाळ संपला आहे.या आधीच दोन वैद्यकीय अधिकार्यांनी सोयगाव ग्रामीण रुग्णालय सोडले असतांना दि.30 जूनला वैद्यकीय अधीक्षक डॉ.शंकर कसबे यांची सेवानिवृत्ती आहे.त्यामुळे ऐन कोरोना संसार्गात सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार केवळ डॉ.केतन काळे यांचेकडे राहणार आहे.जिल्हा चिकित्सक औरंगाबाद यांचेकडून अद्यापही सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचार्यांच्या पदांच्या भरती बाबतीत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
Leave a comment