भराडी । वार्ताहर
ता.सिल्लोड परिसरातील शेतकर्यांना जिल्हा बँकेमार्फत व यूनियन बँकेमार्फत पिक कर्जाचे त्वरित वाटप करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी सिल्लोडच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राज्य शासनाने बँकानी शेतकर्यांना पिक कर्ज देताना सर्व राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकेने वेठीस धरु नाही,असे आदेश दिले असताना सुध्दा भराडी ता.सिल्लोड येथील जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येक शेतकर्यांना मागील सहा महीन्याचे व्याज भरण्यास भाग पाडत आहे,त्याच बरोबर सात-बारा फेरफार नक्कलची व बेबाकी प्रमाणपञची गरज नसताना सुध्दा मागणी करुन शेतकर्यांना वेठीस धरण्याचे काम बँक आधिकारी करताना दिसत आहे, व शेतकर्यांनी या चालु वर्षी पिककर्ज मिळविण्या- साठी राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकेकडे सर्व कागद पञाची जुळवाजुळव करुन सुध्दा सदरिल बँका शेतकर्यांची लहान लहान गोष्टीसाठी अडवणुक करुन हेतुपुरस्कर कर्ज देण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे, तरी संबधीत जिल्हा बँकेच्या वरिष्ठ आधिकार्यांनी याप्रकरणी जातीने लक्ष देऊन शेतकर्यांना त्वरित पिककर्जाचे वाटप करावे, नसता भाजपा जिल्हाभर अंदोलन छेडेल असा इशारा लेखीनिवेदना द्वारे भारतीय जनता पार्टी सिल्लोडकडुन जिल्हा बँक शाखा भराडीला देण्यात आला आहे,यावर ज्ञानेश्वर मोटे,अशोक गरूड, रघुनाथ पांडव, गजानन घोगंटे,अमोल शेळंके, प्रकाश चाथे,विठ्ठल सोनवणे,नईम शाहा,सुरेश सोनवणे यांच्या स्वाक्षर्या आहे..
Leave a comment