सिल्लोड । वार्ताहर
महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या निर्देशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने शहर निर्जंतुकीकरण साठी अभियान सुरू आहे. मंगळवार (दि.23) रोजी कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या यूपीएल स्प्रेयर या कीटक नाशक फवारणी यंत्राचा शहरात हायपोक्लोराईड फवारणी साठी समावेश करण्यात आला आहे. मंगळवार (दि.23) रोजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्याहस्ते या उपक्रमाचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दि.22,23 व 24 जून असे तीन दिवस जनता कर्फ्यु पालण्याचा निर्णय घेतला,. या जनता कर्फ्युची संधी साधत ना. अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने सिल्लोड नगर परिषदेने तीन दिवसात संपूर्ण शहर निर्जंतुकीकरणासाठी हायपोक्लोराईड व धूर फवारणी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला . या उपक्रमाचे उद्घाटन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. आज मंगळवार रोजी अभियानाचा हा दुसरा दिवस असून काल दिवसभरात राबविण्यात आलेल्या या अभियानाचे शहर वासीयांनी स्वागत करून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शहर निर्जंतुकीकरण च्या या अभियानात विविध यंत्र समुग्री चे साहाय्य घेण्यात येत आहेत. यामध्ये नगर परिषद चे वाहन, अग्निशमन दलाचे वाहन, जवळपास 300 कृषी हात पंप, ट्रॅक्टर, व त्यांनतर आता यूपीआय कंपनीच्या यूपीएल स्प्रेयर या यंत्राचा समावेश करण्यात आला आहे. शहरातील आझाद चौक भागात यूपीएल स्प्रिंग फवारणी चा शुभारंभ करण्यात आला . यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, पुरवठा नायब तहसीलदार संजय सोनवणे, मुख्याधिकारी सय्यद रफिक, निराधार योजनेचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे,बाजार समितीचे संचालक सतीश ताठे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, कृषी सेवा केंद्र असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, नगरसेवक आसिफ बागवान, मतीन देशमुख, राजू गौर, शिवसेना तालुका उपप्रमुख रघुनाथ घरमोडे, धैर्यशील तायडे, विशाल जाधव,रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहमद हनिफ, मुश्ताक देशमुख, यांच्यासह अकिल देशमुख, शैलेश कटारिया, गौरव सहारे, अक्षय मगर , दिपक गायकवाड, आदींची उपस्थिती होती.
Leave a comment