सामाजिक वन विभागाच्या अधिकार्यांकडून एक लाख लागवड करण्यात आलेले वृक्ष नेमंक कुठे
पाचोड । विजय चिडे
राज्य सरकार दरवर्षी 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. तसेच वृक्ष लागवडीसाठी प्रसार-प्रसिद्धी करीत अनेक योजना राबवीत आहे. मात्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला साफ लावण्याचे काम स्वतः सामाजिक वन विभाग करत असून, सामाजिक वनीकरण विभागाद्वारे कोट्यवधी रुपये खर्च करून लावलेल्या झाडांची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पैठण तालुक्यातील वडजी येथील गायरान जमिनी मध्ये लावण्यात आलेल्या वृक्षांची बघावयास मिळत आहे.
वडजी शिवारामध्ये मोठी गायरान जमीन असून या उजाड माळरानावर नंबर वृक्ष लागवड करून वनीकरण वाढवण्यासाठी शासनाकडून मागील वर्षी जून-जुलैमध्ये पन्नास हजार खड्ड्यामध्ये एक लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती मात्र जमिनी मधील वृक्ष दहा टक्केही दिसत नाही मग हे वृक्ष गेले कुठे असा प्रश्न गावातील नागरिक गणेश ताकपीर, गजानन भांड,अनिरुद्ध गोजरे,अक्षय भांड, घनश्याम मापारी, विनोद भांड, प्रशात भांड,गणेश राजेंद्र भांड, मनोज गोजरे, आक्षय दिलीप गोजरे, बापुसाहेब भांड,बालाजी भांड,विशाल कल्याण गोजरे यांनी या वृक्षाची पाहाणी करून संबंधित अधिकार्यांनी केलेल्या भ्रष्टाचारांची चौकशी करण्यात यावे अशी मागणी केली आहे. जंगलांचे घटते प्रमाण वाढते प्रदूषण व कमी होत असणारे पर्जन्यमान यावर मात करण्यासाठी राज्य सरकार वृक्ष लागवडीवर सध्या भर देत आहे. यासाठी वृक्ष लागवड योजनांसारख्या योजना राबविल्या जात आहेत.वृक्ष लागवड कराण्याचे ही त्याच अधिकार्यांकडून आवाहन केले जात आहे,एवढेच नाही तर प्रचार-प्रसार आणि वृक्षलागवडी साठी सरकार कोट्यवधीचा निधी खर्च करीत आहे.पैठण तालुक्यातील सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून वडजी येथील गायरान जमिनी मध्ये वृक्षारोपण केले या वृक्षाची देखभाल करण्यासाठी लाखोंची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान लागवड करण्यात आलेले वृक्ष सामाजिक वनीकरणाच्या मनमानी कारभारामुळे संपूर्ण खड्डे मोकळी असल्याचे दिसून येत आहे. या कामासाठी लाखोंचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. परंतु हा निधी फक्त अधिकार्यांच्या खिशामध्ये जाताना दिसत आहे. उल्लेखनीय म्हणजे सामाजिक वनीकरणाच्या अधिकारी वृक्षसागवडीसंबंधाने जनजागृती करण्यासाठी या झाडांच्या शेजारून जाते तरी या प्रकाराची साधी दखल सुद्धा सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकार्यांनी घेतली नाही. याबाबत कार्यक्षत्र अधिकारी असणार्या वनपाल संध्या जाधव यांना दूरध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांचा दूरध्वनी हा बंद दाखवत असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
Leave a comment