बोरगांव बाजार । वार्ताहर
बोरगांव बाजार ता.सिल्लोड येथील जिल्हा परिषद शाळेत अपुर्ण शाळा खोल्यामुळे व मागील वर्षी जास्त पाऊस पडलेल्यामुळे शाळाखोली पुर्ण जमिन दोस्तझालेल्या खोलीच्या बदल्यात संबधीत विभागाने नवीन इमारतीची व तसेच काही वर्ग खोल्याची दुरूस्ती मंजुरी द्यावी व निधी उभारण्यास मदत करावी अशी मागणी पालकांतुन होत आहे,
या स्पर्धेच्या युगात सर्वपालक आपल्या पाल्याने चांगल्या शाळेत शिक्षण घ्यावे व यासाठी पालक सर्व प्रथम बघतात ती शाळेची इमारत,ग्रांऊन्ट नतंर एकावर्गात किती विद्यार्थ्यी बसणार याच बरोबर शिक्षणाचा दर्जा या सर्वगोष्ठी बघुन प्रवेश घेतात, या सर्व सुविधा आता जिल्हा परिषद शाळेत मिळत असल्यामुळे आधिकाअधिक पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश महागड्या शाळेत नघेता,त्या शाळेना टक्कर देणार्या जिल्हा परिषद शाळेत घेताना दिसत आहे, पंरतु बोरगांव बाजार येथील काही पदाधिकार्यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे नक्कीच विद्यार्थ्याचे नुकसान होणार ? कारण की बोरगांव बाजार ता.सिल्लोड येथील दोन शाळा खोल्या दुरूस्तीची मंजुरी जिल्हा परिषद औरंगाबाद कडुन तीन ते चार महीन्यापुर्वी मिळालेली आहे,परंतु सदरील जिल्हा परिषद शाळेच्या दोन शाळा खोल्याची दुरूस्तीचे कामाविषयी ग्रामपंचायती व लोकप्रतिनिधीकडुन कोणताच पाठपुरावा केला जात नसल्यामुळे यावर्षी हेशाळा खोल्या दुरूस्तीचे काम होणार कि नाही अशी भिती पालकांत निर्माण झाली आहे, याचे कारण असे कि वर्ग खोल्या कमी व विद्यार्थ्या संख्या जास्त असल्यामुळे आपल्या पाल्याला या लोकप्रतिनीधीच्यी वेळकाडु धोरणामुळे उघड्यायावर बसुन ज्ञानार्जन करावे लागते कि काय असा प्रश्न पडला आहे,यामुळे विद्यार्थ्याचे माञ शैक्षणिक नुकसान होणार आहे,वर्ग खोल्या कमी असल्यामुळे एकतर विद्यार्थ्याना उघड्यावर वर्हाट्यात किवा दोन वर्गाचे मुलाना एकञ बसवुन शिक्षकांना शिक्षण द्यावे लागणार आहे, तरी संबधीत आधिकार्यांनी या महत्वाच्या प्रश्नावर लक्ष देऊन हा गंभीर विषय हाथाळावा व नवीन शाळा खोल्याना व जुन्या शाळा खोल्याच्या दुरूस्तीची मान्यता देऊन निधी उभारुन देण्यास मदत करावी अशी मागणी पालकांतुन होत आहे.
Leave a comment