वडिलांच्या दिवसाला वृक्षारोपण करून मरावे परी वृक्षरूपी उरावे हा संदेश
सिल्लोड । वार्ताहर
तालुक्यातील आदर्श व अभिनव प्रतिष्ठानच्या सहकार्याने आकारास येत असलेल्या राज्यातील एकमेव पर्यावरन ग्राम ‘बहुली’ या गावी स्मशान वाटिका हा उपक्रम राबविन्यात येत आहे. आज दि.20 रोजी गावातील नुकतेच वृद्धपकाळाने निधन झालेले स्व. तुळसीराम दौलत जंजाळ यांच्या तेराव्याला त्यांचे पुत्र व अभिनव प्रतिष्ठानचे सदस्य संदीप पा. जंजाळ यांनी पर्यावरन संवर्धन व्हावे व वडिलांची स्मृति वृक्ष रूपाने जोपासली जावी हा उदात्त हेतुने प्रेरित होवून देशी व अधिक ऑक्सीजन देणारे वृक्ष लागवड करून पंचक्रोशित एक आदर्श निर्माण केला आहे.ऊंबर, अशोका, वड आदि सुमारे 50 झाडे यावेळी लावण्यात आली.
हा परिसर आधि पूर्ण स्वच्छ व तनमुक्त करण्यात आला. आली.मरावे परी वृक्ष रूपी उरावे हा सुविचारास अनुरूप हा उपक्रम आहे. या स्मशान भूमि मध्ये या आधीही 100 हुन अधिक कडू निंबाच्या देशी वृक्षांची यशस्वी लागवड करून सर्व झाडे जगवन्यात आली आहे. विविध जातींची देशी वृक्ष या ठिकाणी असल्याने जैवविविधता जतन होत आहे. यावेळी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.
Leave a comment