सिल्लोड कोरोना मुक्त करण्यासाठी प्रत्येकाने संकल्प करा-अब्दुल सत्तार 

सिल्लोड । वार्ताहर

सिल्लोड शहरात आतापर्यंत सात जणांना कोरोनाची लागण झाली असून ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे .कोरोना साथ रोगाच्या अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशार्‍याप्रमाणे येत्या जुलै महिन्यात कोरोनाचे संकट रोखण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून सिल्लोड नगरपरिषद आज पासून तीन दिवस संपूर्ण शहर निर्जंतुकीकरणासाठी जम्बो प्रोग्राम राबवित आहे असे स्पष्ट करीत आपली सुरक्षितता आपल्याच हातात असल्याने सिल्लोड कोरोना मुक्त करण्याचा प्रत्येकाने संकल्प करावा असे आवाहन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी केले.

गेल्या आठ दिवसात सिल्लोड मधील तीन जणांना कोरोना ची लागण झाली. या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दि.22,23 व 24 जून असे  तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. जनता कर्फ्युची संधी साधत ना. अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने सिल्लोड नगर परिषदेने जनता कर्फ्यू च्या तीन दिवसात संपूर्ण शहर निर्जंतुकीकरणासाठी हायपोक्लोराईड  व धूर फवारणी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाचे उद्घाटन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना  अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ना.अब्दुल सत्तार बोलत होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, नगराध्यक्षा राजश्री निकम, युवानेते अब्दुल समीर, तहसीलदार रामेश्वर गोरे ,उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, जिल्हा  परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, सिल्लोड कृउबा चे सभापती अर्जुन पाटील गाढे,उपसभापती नंदकिशोर सहारे, डॉ. मच्छिंद्र पाखरे ,डॉ. संजय जामकर, निराधार योजनेचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, मुख्याधिकारी सय्यद रफिक, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमित सरदेसाई, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जयस्वाल आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना ना. अब्दुल सत्तार म्हणाले की , यापूर्वी ही सिल्लोड नगर परिषदेने कोरोनाला रोखण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. सध्या पावसाचे दिवस आहेत यामुळे नागरिकांना ताप , सर्दी, खोकला, डेंग्यू सदृश्य इत्यादी आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही . तसेच कोरोनाची अशी स्थिती कायम असली तर भविष्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो यासाठी आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार असल्याने शहर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. सदर अभियान यशस्वी झाल्यास हा उपक्रम सिल्लोड व सोयगावच्या ग्रामीण भागातही राबविण्यात येईल. यासाठी  जिल्हाधिकारी यांनी मुबलक औषध पुरवठा उपलब्ध करून दिला असल्याचे ना. अब्दुल सत्तार म्हणाले. कोरोनाच्या  संकटकाळात डॉक्टर नर्स ,वॉर्ड बॉय, पोलीस ,शासकीय कर्मचारी, सफाई कामगार हे आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत . दूरदर्शन वरील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी एका जाहिरातीचे उदाहरण देऊन कोरोना संक्रमण रोखणे शक्य असल्याचे स्पष्ट करीत सिल्लोड नगरपरिषद राबवित असलेल्या अभियानास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन ना. अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले. दरम्यान शहरातील प्रियदर्शनी चौक भागात ना. अब्दुल सत्तार यांनी स्वतः अग्निशामक दलाच्या फायर गनने शहरात हायपोक्लोराइड ची फवारणी करून या उपक्रमास सुरुवात केली. त्यांनतर शहरात हायपोक्लोराईड फवारणी करणार्‍या  ट्रॅक्टचा ताबा घेवून ना. अब्दुल सत्तार यांनी सर्वांच्या भुया उंचावल्या. कोरोनाला रोखण्यासाठी ना. अब्दुल सत्तार यांची तळमळ या निमित्ताने दिसून आली. शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या या अभियानाची पाहणी करून या उपक्रमातून एकही वाडी, वस्ती वंचित राहता कामा नये अशा सूचना ना. अब्दुल सत्तार यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिल्या.

शहर निर्जंतुकीकरणासाठी न.प.चा नियोजनबद्ध आराखडा 

ना.अब्दुल सत्तार यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्षा राजश्री निकम तसेच युवा नेते अब्दुल समीर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 22 ,23, व  24 जून अशा तीन दिवसात संपूर्ण सिल्लोड शहर निर्जंतुकीकरणासाठी न.प.ने नियोजनबद्ध आराखडा तयार केला आहे . या आराखड्यानुसार शहरात एकूण 4 झोन तयार करण्यात आले असून प्रत्येक झोनमध्ये 75 हातपंप ह्याप्रमाणे 300 हातपंपाच्या माध्यमातून शहरात हायपोक्लोराइड ची फवारणी करण्यात येत आहे. शिवाय दोन वाहनांच्या माध्यमातून धूर फवारणी तर दोन वाहन व एक अग्निशामक दलाच्या वाहनाने शहरात निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे . या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रभाग निहाय पथक प्रमुखाची नियुक्ती करण्यात आली असून यासाठी नगरसेवकांचे सहकार्य लाभत असल्याचे नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

शहरातील व्यापारी व नागरिकांची कोरोना विषयी मोठी जागृतता असून कोरोनाला रोखण्यासाठी त्यांनी आतापर्यंत शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन केले आहे. व्यापारी बांधवांच्या वतीने आजही स्वयंस्फूर्तीने शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. हे कार्य अभिनंदनीय असून कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येकाने आपल्या परीने सहकार्य केले आहे . सिल्लोडला कोरोना पासून मुक्त करण्यासाठी शहर व परिसरातील शेतकर्‍यांनी हायपोक्लोराइड फवारणीसाठी न.प.ला काही तासात जवळपास तीनशे कृषी हात पंप उपलब्ध करून दिले. कोरोनाच्या संकट काळात शेतकरी व्यापारी व नागरिकांच्या या अभूतपूर्व सहकार्याने भारावून गेलो असल्याचे ना. अब्दुल सत्तार म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी सय्यद रफिक यांनी केले. देवेंद्र सूर्यवंशी यांनी सूत्र संचलन तर युवानेते अब्दुल समीर यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी नगरसेवक रउफ बागवान, सुनील दुधे, सुधाकर पाटील, शेख बाबर,आसिफ बागवान,प्रशांत क्षीरसागर, विठ्ठल सपकाळ, मतीन देशमुख, शंकरराव खांडवे ,रईस मुजावर ,राजू गौर, रतनकुमार डोभाळ, शेख सलीम हुसेन, बेग चांद, मिर्झा , मनोज झंवर, सत्तार हुसेन, जितू आरके, वकील वसईकर, शकुंतलाबाई बन्सोड, अनिस कुरेशी ,मोईन पठाण, पठाण शेरखान,जुम्मा खा पठाण यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, धैर्यशील तायडे ,शिवसेना तालुका उपप्रमुख रघुनाथ घरमोडे ,रवि रासने, शिवा टोम्पे , रवि गायकवाड,  व्यापारी राजेश खिवंसरा, नरेंद्र पाटील, विशाल जाधव, अनिल बोरा, प्रवीण कटारिया, अमित बाकलीवाल, विशाल सोनार आदींची उपस्थिती होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.