औरंगाबाद |  वार्ताहर 
 औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 102कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3632 झाली आहे. यापैकी 1968 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 191 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1473 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
 जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. बारी कॉलनी (1), वाळूज (3), गजानन नगर (3), गजगाव, गंगापूर (1), न्याय नगर, गारखेडा परिसर (1), मयूर नगर (3), सुरेवाडी (1), शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी (2), भाग्य नगर (5), एन अकरा, सिडको (2), सारा वैभव, जटवाडा रोड (2), जाधववाडी (2), मिटमिटा (3), गारखेडा परिसर (3), एन सहा, संभाजी पार्क (1), उस्मानपुरा (1), बजाज नगर, वाळूज (2), आंबेडकर नगर, एन सात (1), भारत नगर, एन बारा, हडको (1), उल्का नगरी, गारखेडा (1), नॅशनल कॉलनी (1), नागेश्वरवाडी (2), संभाजी कॉलनी (1), आनंद नगर (1), आयोध्या नगर, सिडको (1), शिवाजी कॉलनी, मुकुंवाडी (3), संत ज्ञानेश्वर नगर (1), राजे संभाजी कॉलनी (4), मुकुंदवाडी (1), न्यू पहाडसिंगपुरा, जगदीश नगर (1), काल्डा कॉर्नर (1), एन सहा, मथुरा नगर (1), नवजीवन कॉलनी, हडको, एन अकरा (4), एन अकरा (2), टीव्ही सेंटर (4), सुदर्शन नगर (1), दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (5), जय भवानी चौक, बजाज नगर (2), महादेव मंदिर परिसर, बजाज नगर (1),  शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), सारा वृंदावन हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (3), स्वेदशिप हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (3), फुले नगरी, पंढरपूर (3), पंचमुखी महादेव मंदिराजवळ (1), करमाड (3), मांडकी (2), पळशी (4), शिवाजी नगर, गंगापूर (4), भवानी नगर, गंगापूर (1) या भागातील कोरोना बाधित आहेत. यामध्ये यामध्ये 49 स्त्री व 53 पुरुष आहेत.
        *****

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.