सोयगाव । मनिषा पाटील
कोरोना संसर्गाच्या लॉकदावून मध्ये अडकलेल्या काळी-पिवळी टॅकसी चालकांवर तीन महिन्यापासून बेकारीची कुर्हाड कोसळली असतांना लॉकडाऊनच्या नियमात झालेल्या शिथिलते बाबत कोणताही निर्णय शासन पातळीवर घेण्यात आला नसल्याने काळी-पिवळी टॅकसी चालकांना मासिक पंधरा हजार रु मदत करण्यात यावी याबाबतचे निवेदन गुरुवारी मराठवाडा टॅकसी युनियन संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे -पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोयगावला तहसीलदार प्रवीण पांडे देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे,कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनच्या काळात टॅकसी चालकांची मोठी उपासमार झाली असतांना लॉकडाऊनच्या शिथिलतेच्या काळात कोमातही निर्णय न घेता पुन्हा निर्बंध घालण्यात आले असल्याने शासनाकडून काळी-पिवळी टॅकसी चालकांवर अन्यायकारक भूमिका लादण्यात आली आहे.याबाबतच्या निर्णयावर फेर निर्णय घेवून प्रवाशी संख्येत वाढ करावी अन्यथा या काळी-पिवळी टॅकसी चालकांना मासिक पंधरा हजार रु मदत देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
Leave a comment