पैठण । वार्ताहर
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर, पैठण येथील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता महाराष्ट्र शासनाने पाठ्यपुस्तक नियोजनाप्रमाणे उपलब्ध करून देताच सोशल डिस्टिंग चे पालन करत आर्य चाणक्य प्रा. विद्यामंदिर,पैठण येथे इयत्ता 1ली ते 4थी करिता दि.18,19व20जून निश्चित करून वाटप करण्यात आले .तर इयत्ता5वी ते7वी करिता दि. 22, 23 व 24 जुन रोजी वाटप करण्यात करण्यात येणार आहे. याप्रसंगी जागृत पालकांनी देखील या नियोजनाचे स्वागत केले. याप्रसंगी मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांच्या शुभहस्ते पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पालक मदन जोतिष, संतोष दारकुंडे,उमाकांत सोळंके,संतोष पाटील,राजेश सवने,सुनिल डाके,उमेश सोलाटे आदी उपस्थित होते.
Leave a comment