जिल्ह्यात 1284 रुग्णांवर उपचार सुरू, आज 91 रुग्णांची वाढ
औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 91 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3207 झाली आहे. यापैकी 1753 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 170 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1284 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
घाटीमध्ये तपासणीसाठी आलेला कैदी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार केल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली .इमरान बेग आमेर बेग (२५ , रा . काबरानगर गारखेडा ) असे फरार कैद्यांचे नाव आहे . याविषयी बेगमपुरा ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
१६ मार्च रोजी रात्री संग्रामनगर रेल्वे रुळाजवळ अक्षय प्रधान याचा आरोपी इमरान आणि सोहेल शेख यांनी धारदार शस्त्राने खून केला होता . या गुंह्यात १७ मार्च रोजी गुन्हेशाखेने आरोपीला अटक केली होती . तेव्हापासून ते जेलमध्ये होते . घाटीत उपचारासाठी इमरानला दाखल केले होते . आज सकाळी त्याने तेथून धूम ठोकली .याविषयी बेगमपुरा ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. राजन नगर (1), बायजीपुरा (1), रहीम नगर (1), युनुस कॉलनी (1), हनुमान चौक चिकलठाणा (1), राम नगर (1), बजाज नगर (2), रशीदपुरा (1), नारळीबाग (2), क्रांती नगर (1), अंबिका नगर (1), पुंडलिक नगर (3), नागेश्वरवाडी (2), नक्षत्रवाडी (1), हर्सुल (2), एन नऊ सिडको (2), एन अकरा सिडको (2), मिल कॉर्नर (1),एन पाच सिडको (1), एन आठ सिडको (1), शिवाजी नगर (1), जाधववाडी (2), शंभू नगर (4), चिकलठाणा (5), रामकृष्ण नगर (2), इटखेडा (2), विश्वभारती कॉलनी (2), बीड बायपास (1), न्यू हनुमान नगर (2), जय हिंद नगर, पिसादेवी (1), भानुदास नगर (1), श्रीविहार कॉलनी, बीड बायपास (3), जाधववाडी (1), पळशी (1), आरीश कॉलनी (1), गौतम नगर, प्रगती कॉलनी (1), द्वारका नगर, हडको (1), समता नगर (1), शिवाजी नगर (2), लहू नगर (2), राम नगर (1), ब्रिजवाडी (1), शहानूरवाडी (4), मुजीब कॉलनी (5), रामेश्वर नगर (2), न्यू विशाल नगर (1), मयूर नगर (1), बुढीलेन (1), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी (1), सिडको महानगर (1), लोकमान्य चौक, बजाज नगर (2), सुयोग हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (4), साऊथ सिटी, सिडको महानगर (1), शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), शिवालय चौक, बजाज नगर (1), सारा गौरव, बजाज नगर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 35 स्त्री व 56 पुरूष आहेत.
Leave a comment