सोयगाव । वार्ताहर

बळीराजा जलसंजीविनी योजनेअंतर्गत बनोटी-मुखेड साठवण तलावाच्या संपादित जमिनीनीचा पहीला हप्त्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. गेल्या दहा वर्षापासुन रखडलेल्या बनोटी-मुखेड लघुसिंचन प्रकल्पास केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी बळीराजा जलसंजीविनी योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिल्याने तलावाचे काम प्रगतीपथावर चालु असुन डिसेंबर 2020 पर्यंत पाणी अडविण्याचे नियोजन झाले आहे.

मात्र शेतकर्‍यांना संपादीत जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकरी चिंतातूर झाल्याने शेतकऱ्याने मोबदला मिळाल्याशिवाय काम होऊ देणार नसल्याचा पञित्रा घेतल्याने ठेकेदार सचिन चोबे यांनी शेतकऱ्यांचे शंकांचे निरसन करीत जमिनीचा मोबदला दिला जाणार असल्याचे आश्वासनानंतर 250 लक्ष रुपयाचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. बनोटी साठवण तलावाकरीता शासनाने मंजूर केलेल्या 3583 लक्ष रुपयातुन 55.41 हेक्टर क्षेत्रावरील जमिन संपादीत करण्यात आली असुन बनोटी आणि पळाशी शिवारातील 265 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने परीसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.