खुलताबाद । वार्ताहर
वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव शिरसाट गल्लेबोरगांवकर यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार सय्यद इम्तियाज़ जलील यांच्या निवास्थानी काही पदाधिकार्यांसह भेट घेऊन खुलताबाद तालुक्यातील विविध प्रश्नांवर सविस्तार चर्चा केली. या वेळी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध समस्या विषयी देखील चर्चा झाली. यात प्रामुख्याने गल्लेबोरगाव येथील रेणुका माता मंदिरचे वॉल कंपाऊंडच्या बाबतीत चर्चा करण्यात आली तसेच सदर मंदिरचे सभागृहासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन खासदार जलील यांनी दिले.
दरम्यान कोरोना’च्या संसर्गाने आणि त्यामुळे घडून आलेल्या आर्थिक संकटाने खुलताबाद तालुक्यातील, गोरगरीब मजुरांचा, शेतातल्या मजुरांचा प्रश्न गंभीर झाला आहे. आणि अशा संसर्ग संक्रमणकाळात तो आणखी गंभीर होऊ शकतो हे पुन्हा एकदा पुढे आले आहे. जगप्रसिद्ध वेरूळ येथील पर्यटन क्षेत्र हे आर्थिक मदतीच्या दृष्टीने संघटित क्षेत्रापेक्षा अधिक लक्ष पुरवावे लागेल. याबाबत ही चर्चा करण्यात आली. यावेळेस वसंत शिरसाट यांच्यासह पत्रकार सेवासंघाचे तालुका अध्यक्ष मुक्तार सय्यद, नईम शाह, आजीनाथ बारगळ, पत्रकार संतोष करपे, सलमान फ़य्याज़ खान आदि उपस्थित होते.
Leave a comment