विहामाडंवा । वार्ताहर
कृषी विभाग-तालुका कृषी अधिकारी पैठण खरीप हंगाम शिवार फेरी अंतर्गत पैठण तालुक्यातील विहामांडवा कृषी मंडळातील...पाचोड (बुद्रुक) येथील शेतकरी किशोर कचरू गवारे यांच्या शेतामध्ये बीज प्रक्रियाचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच बीबीएफ वर पेरणी बाबत मार्गदर्शन केले. यावेळी भागवत साहेबराव भुमरे, तुकाराम नारायण शेळके ,सुरेश शेळके आदी शेतकरी उपस्थित होते.
दावरवाडी येथेही निंबोळी गोळा करण्याचे महत्व याबाबतचे मार्गदर्शन पैठण तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी केले, यावेळी बाळू रंधे कृषी मित्र मिठू चोरमले आधीसह शेतकरी महिला उपस्थित होत्या....मौजे कुतुब खेडा येथे संदीप काकडे यांचे बीबीएफ मशीन द्वारे प्रत्यक्ष पेरणी करून घेतली यावेळी विलास ठोंबरे, संतोष मोरे, भरत मोरे आदी शेतकरी उपस्थित होते. वडजी येथे पोखरा अंतर्गत सामूहिक शेततळे यांची तपासणी तालुका कृषी अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी यांनी केली व शेतकरी कचरू भांड यांच्या शेतात बीबीए प्रत्यक्ष पेरणी तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी करण्याविषयीचे मार्गदर्शन केले.सदरील कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी , रामेश्वर भुते, मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत नरके, कृषी पर्यवेक्षक , किशोर पाडळे, विनोद अंभोरे,कृषी सहाय्यक प्रवीण नाचन, शंभूराजे जाधव, श्रीमती रायकर मॅडम, अनिरुद्ध हनवते उपस्थित होते.
Leave a comment