विहामाडंवा । वार्ताहर
शेतकरी बंधुनो पीक उत्पादन खर्चात जो पर्यंत बचत करता येणार नाही तोपर्यंत आपली निव्वळ उत्पन्नात वाढ होणार नाही हे वास्तव आहे मग असे कोणते पर्याय निसर्गाच्या कृपेने आपल्याकडे उपलब्द आहे त्याचे काय महत्व आहे बरं याचा उपयोग नेमका काय आहे हे जोपर्यंत पटणार नाही तो पर्यंत या विषयाचे महत्व लक्षात येणार नाही,असे प्रतिपादन विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी केले.
याबाबत मार्गदर्शन करताना ठोंबरे यांनी सध्या कडुलिंबाच्या झाडाखाली निबोळी पडणं सुरू झाले आहे, हा कालावधी आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे कारण या निबोळीपासून आपण निबोळी अर्क घरगुती तयार करू शकतो ,आणि हा अर्क सर्व पिकावर फवारणी करण्यासाठी सर्वोत्तम आहे, त्यामुळे आपण हे लक्षात घेणे जरुरी आहे आपल्या शेताच्या बांधावर जे कडुलिंबाची झाडे आहेत त्यांच्या खालील पडलेल्या निबोळ्या जमा करणे या कामास पेरणीनंतर अग्रक्रम द्यावा इतके ते अत्यावश्यक कार्य आहे आपल्या विभागातील कापूस सोयाबीन मका तूर आदी पिकांवर येणार्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी या अर्कचा खुप प्रभावी उपयोग होतो त्यामुळे या संधीचा फायदा घेत शेतकरी बांधवानी किमान झाडाखालील निबोळी जमा करून सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात असे आवाहन विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद औरंगाबाद कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.
Leave a comment