अतिवृष्टीमुळे शेतीचे झाले होते नूकसान
फर्दापूर । वार्ताहर
अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या झालेल्या नूकसानीचे पंचनामे करण्याची सुरुवात महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असून तलाठी सुरज गिरी,एस.एस मोरे यांच्या पथकाच्या माध्यमातून फर्दापूर,लेणापूर सावरखेडा शिवारातील शेतीचे पंचनामे करण्यात आले असून उर्वरित पंचनामे लवकरच पूर्ण करून शासनास अहवाल पाठवण्यात येणार असल्याची माहिती तलाठी सुरज गिरी यांनी दिली आहे.
मागील आठवड्यात सलग दोन दिवस वादळी वार्यासह आलेल्या मुसळधार पावसाने फर्दापूर परीसरात तांडव केल्याने वाघूर नदीसह परीसरातील लहानमोठ्या नदीनाल्यांना मोठा पूर येवून पुराचे पाणी फर्दापूर व धनवट शिवारातील शेतांन मध्ये शिरुन पेरणी केलेली शेती मातीसह वाहून गेली होती तर काही शेतकर्यांच्या विहरी ही या पुराच्या तडाख्यात वाहून गेल्याने व काही विहरी खचून पडल्याने प्रचंड नूकसान झाले होते या वादळी वार्यासह आलेल्या मुसळधार पावसाच्या तांडवाने फर्दापूर धनवट सह सावरखेडा,लेणापूर,ठाणा शिवारात ही शेतीचे नूकसान झाल्याने महसूल प्रशासनाच्या वतीने नूकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे फर्दापूर,लेणापूर व सावरखेडा शिवारात तलाठी सुरज गिरी,एस.एस मोरे यांच्या पथकांच्या माध्यमातून हे पंचनामे करण्यात येत असून सदरील अहवाल लवकरच प्रशासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहीती तलाठी सुरज गिरी यांनी दिली आहे.
फर्दापूर शिवारातील पंचनामे व कंसात झालेले नुकसान
गट क्रं 174 भुजंग नथ्थु जाधव( 4.5एक्कर)उषाबाई भुजंग जाधव (4.5 एक्कर) सुनीताबाई दादाराव जाधव (1 एक्कर)गट क्रं 175 शेख बाबू अब्बास (5 एक्कर)सांडू आसाराम घण (1विहीर)गट क्रं 159 राजु सांडू साबळे (2 एक्कर)गट क्रं 174 शेणफड रायभान लव्हाळे 5 एक्कर) गट क्रं.159 विजय सांडू साबळे(1 एक्कर)सुरेश सांडू साबळे(1.5एक्कर)गट 159 सुखदेव श्रीपत महाकाळ(1एक्कर)गट क्रं.296 मीराबाई दत्तू लंबे (2 हेक्टर 3आर) गट क्रं.258 शिवाजी नामदेव जाधव(1 एक्कर) यांच्या सह अन्य नुकसानग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे फर्दापूर शिवारात पूर्ण करण्यात आले असून लेणापूर व सावरखेडा शिवारात पंचनामे सुरु आहेत.
Leave a comment