औरंगाबाद । ंवार्ताहर
मध्यप्रदेश येथून गावठी पिस्तूल आणून शहराच्या विविध भागात विक्री करणारा व खरेदी करणारा सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. सागर कदम (30 रा. आंबेवाडी ता. गंगापूर) व महेश काळे (25 रा. जामगाव ता. गंगापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेला 16 जून रोजी माहिती मिळाली की, जामगाव येथील महेश काळे याने एक गावठी पिस्तूल विकत घेतले असून तो काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहे.
त्यानुसार पोलिसांनी तात्काळ जामगाव येथे जाऊन महेश काळे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली. सुरवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. आणखी विचारपूस केल्यानंतर सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्याने सागर कदम याचेकडून एक गावठी पिस्तूल विकत घेतली आहे. ती एका ठिकाणी बाभळीच्या झुडपात लपून ठेवली आहे. पोलिसांनी पंचासक्षम जाऊन पिस्तूल जप्त केली. त्यानंतर सागर कदम यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की, सदरचा गावठी कट्टा त्याने मध्यप्रदेश येथून विकत आणून महेश काळे यास विकला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी गंगापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
Leave a comment