वैजापुर । वार्ताहर
गेल्या जवळपास 70 दिवसांपासून कोरोना महामारीमुळे वैजापूर शहर व ग्रामीण भागातील सर्व छोटे मोठे उद्योगधंदे, कामकाज बंद असल्याने हातावर पोट असणार्या गरजूंना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली असुन औरंगाबाद जिल्हा कोरोनाग्रस्त असल्याने हा लॉकडाऊन उघडला तरी लग्नसराई जवळपास संपल्याने बॅन्ड वाजवणारे मंडळींना कोणाकडेच काम मिळाले नाही. आणि म्हणूनच भारतीय जैन संघटना, वैजापूर व के.पी.सुपर मार्केट, वैजापूर व वैजापूर तालुका महसूल कर्मचारी संघटना यांच्या वतिने गरजवंतांना सहकार्याच्या भावनेतून एक हात मदतीचा देण्यात आला.
यावेळी दत्तनगर, वैजापूर, सवंदगाव, जातेगाव, तलवाडा येथील या गरजवंतांच्या पोटाची भुक भागविण्यासाठी किराणा साहित्याच्या कीट तयार करून त्यांचे घरपोच वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार निखिल धुळधर साहेब, गटविकास अधिकारी मोकाटे साहेब, नायब तहसीलदार महेंद्र गिरगे साहेब, भारतीय जैन संघटनेचे निलेश पारख, पारस पेटारे आदी उपस्थित होते. याकरिता प्रकाशचंदजी बोथरा, हेमंत संचेती, राजेश संचेती, प्रफुल संचेती, विशाल संचेती, दिपक सारडा यांचे सहकार्य लाभले.
Leave a comment