औरंगाबाद । वार्ताहर
गेली दोन महिन्यांपासून करोना केविड 19 या रोगाची साथ सर्वात जास्त महाराष्ट्रात पसरलेली आहे , त्या मुळे येथील शासकीय यंत्रणा, पोलीस कर्मचारी, आरोग्य सेवा आणि महसूल कर्मचारी यांच्यावर सर्वात जास्त मोठया प्रमाणात ताण पडला असून हे सर्व अहोरात्र मेहनत घेत आहेत,
कोविड 19 च्या कामासाठी जे शासकीय कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स,पॅरामेडिकल स्टाफ ,इत्यादी कर्मचार्यांना त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी,त्यांच्या मनावरील भय, ताणतणाव कमी करण्यासाठी ,आणि त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी श्री श्री रविशंकरजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग च्या माध्यमातून महाराष्ट्र शासनास अश्या कर्मचार्यांसाठी विनामूल्य प्राणायाम,ध्यान,योगा आणि सुदर्शन क्रिया चे शिबीरे घेण्यासाठी प्रस्ताव दिला होता ,आणि महाराष्ट राज्याचे आरोग्य मंत्री मा.राजेश जी टोपे यांनी आज ताबडतोब या आर्ट ऑफ लिविंग च्या प्रस्तावास मंजुरी दिली आणि शासकीय आदेश ही जारी केले संमधित अधिकार्यांना एक परिपत्र द्वारे आदेश दिले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शासकीय अधिकारी, जे करोना च्या या साथीच्या रोगावर प्रमुख भूमिका निभावत आहेत त्यांच्या साठी या शिबिराचा निश्चित च फायदा होणार आहे , महाराष्ट्रात आर्ट ऑफ लिव्हिग चे सुमारे 4500 प्रशिक्षक या साठी मोलाची कामगिरी बजावणार आहेत. तसेच पोलीस कर्मचार्यांना आणि महसूल विभागाच्या कर्मचार्यांना सुद्धा असे शिबीर करता येईल याचा शासकीय स्तरावर विचार विनिमय चालू आहे, अशी माहिती आर्ट ऑफ लिविंग चे महाराष्ट्र अपेक्स मेंबर श्री प्रभंजन महातोले यांनी सांगितली आहे.
Leave a comment