औरंगाबाद । वार्ताहर
महाराष्ट्र हि संताची भुमी आहे. अनेक संत माहात्म्यांनी संकट काळी वाट मोकळी करून अनेकदा मोठे कार्य केले आहे. त्या त्या वेळच्या संकटकालीन परिस्थितीला सामारे जाऊन पुन्हा एकदा हा आपला ऊज्वल समाज उभारण्याच काम जे खुप शिताफीच असत, अस असलेलं कार्य या संतानी त्याकाळी केलं आहे हे आपल्या सर्वांच्या समोर आहेच. समाज जशी जशी प्रगती करू लागला तशी तशी समाजाच्या अपेक्षा , ध्येय धोरण, महत्वाकांक्षा वाढू लागल्या... प्रत्येक जण या मागच्या 30 वर्षांच्या काळात त्या त्या क्षेत्रांतील सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी धडपडतो आहे आणि यशस्वी हि होत आहे हे समाजाच खर रूप आपल्याला स्वीकारावे लागेल.. ध्येय गाठण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेला हा माणूस आज एकदम थांबला आहे तो पुन्हा एकदा तेवढ्याच वेगाने पुढे जाण्यासाठी. पुन्हा एकदा जगाची चाक तेवढ्याच वेगाने फिरतील किंबहूना त्यांना फिरावच लागेल.. पण सद्य परिस्थितीत हि चाक थांबली आहेत हि वास्तविकता आहे आणि याच कारण आहे जगाला कोरोना सारख्या महाभयंकर अशा महामारीने घातलेला विळखा.
या कोरोना च्या संसर्गान अख्खं जग व्यापल आहे.. आज तरी लस किंवा परिमामकारक औषधी जगापूढे आली नाहि... पण.. हो.. या पणला च अर्थ आहे..जवळपास सर्व जगभर आणि भारतात श्री श्री रविशंकर गुरूजी आणि त्यांच्या आर्ट ऑफ लिव्हिग या माध्यमातून जगाला ओळख तर आहेच आणि गुरूजी च कार्य हि सर्वश्रुत आहे.. योग साधनेतून त्यांनी विकसित केलेल्या सुदर्शन क्रियेने अनेक जण, कित्येक, लाखो लोकांचे जीवनमान आणि जीवणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मकतेमध्ये बदलला आहे हे सुदर्शन क्रिया च्या योग प्रशीक्षण शिबीरातून अनेकांनी अनुभवल आहे आणि ते सर्व काहि आपल्याला या अवलियानी . या महान संत गुरूजीनी दिल आहे... हे वेळोवेळी आपण त्यांच्या अनेक कार्यातुन अनुभवल आहे ... त्यांची याच माध्यमातून हजोरा सुदर्शन क्रिया चे योग प्रशीक्षण शिबीर झाले आहेत.. त्यांच्या सुदर्शन क्रिया च्या योग साधनेतून जेव्हा कोवीड च्या संसर्गा बद्दल तज्ञांकडून मार्गदर्शक सुचीत जसे विषय पुढे आले तसा एक महत्त्वाचा आणि या कोवीड वर मात करण्यासाठी सर्व बाबी बरोबरच एक महत्वपूर्ण बाब गुरूजीच्या समोर आली आणि ती म्हणजे रूग्नाची प्रतीकारशक्ती जर ठणठणीत किंवा मजबूत असेल तर कोवीड अशा लोकांचे काहि बिघडू शकत नाहि , अर्थात दिलेले सर्व आरोग्य विषयक शासकिय नियमाचे पालन करूनच, मग त्या साठी खाण्यापिण्याच्या बाबी आवश्यक आहेत ई. पण शारीरीक स्वास्थ्याबरोबरच महत्वाचे आहे ते मानसिक स्वास्थ .. . आज महाराष्टात राज्य सरकार संसर्गावर काम करीत असताना अत्यंत तणावपूर्ण स्थितित काम करीत आहे..आर्ट ऑफ लिव्हिग च्या माध्यमातून महाराष्ट्राचे अपेक्स चे सदस्य श्री प्रंभजनजी महातोले यांनी गुरूजी च्या कृपा आशीर्वादाने आणि प्रेरणेने महाराष्ट्रात काम करीत आहेतच.
पण महाराष्ट्रातील कोविड 19 या संसर्गावर अहोरात्र काम करणार्या या यौद्ध्यासाठी गुरूजीच्या सुदर्शन क्रिया चे योग प्रशीक्षण शिबीराचे ऑनलाईन विनाशुल्क आयोजन करायचे असे त्यांनी ठरविले आणि मग सुरू झाले त्याविषयीच्या तांत्रिक बाजूच्या परवानगी घेण्याचे काम. महाराष्ट्राचे मा. आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांच्या बरोबर विनाशुल्क सुदर्शन क्रिया योग प्रशीक्षण शिबीराची चर्चा झाल्यानंतर त्यांनी योगशिबीर घेण्यासाठी लगेच मंजुरी दिली त्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिग च्या सर्व टिमकडून त्यांचे आम्हि प्रथतः आभारी आहोत. हे ऑनलाईन सुदर्शन क्रिया योग प्रशीक्षण घेण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिग चे 4500 योग प्रशीक्षक तयार आहेत त्यांच्या कडून हा ऊपक्रम करणार आहेत. मा. मंत्री महोदयांनी महाराष्ट्रात अशा प्रकारची आर्ट ऑफ लिव्हिग च्या माध्यमातून ऑनलाईन सुदर्शन क्रिया योग प्रशीक्षण शिबीराचे आयोजन करण्याचे पत्र संबधीत विभागाला दिले.. आणि ऑनलाईन सुदर्शन क्रियेच्या योग प्रशीक्षण शिबीराला सुरूवात झाली मला सांगायला आनंद होत आहे की आज कोवीड 19 च्या संसर्गा साठी अहोरात्र काम करणार्या एकंदरीत सर्वच स्टाफ डॉक्टर्स, नर्सेस, मदतनीस, पॅरा मेडीकल स्टाफ, पोलीस प्रशासन, सरकारी कर्मचारी यांचे ऑनलाईन सुदर्शन क्रिया योग प्रशीक्षण शिबीर चालू झाली आहेत. आत्ता पर्यंत महाराष्ट्रामध्ये 16500 पोलीस कर्मचारी आणि 17000 डॉक्टर्स नी हा कोर्स केला आहे. जवळपास या संसर्गावर काम करणार्या यंत्रणेतील जवळपास 3 लाख कर्मचारी वर्गाला :सुदर्शन क्रिया करून घेण्याचा आमचा माणस आहे. तीन महिण्यापासुन अंत्यत ताणावपूर्ण परिस्थितीत काम करीत असताना अनेक जणांनी असे सांगितले आहे की या सुदर्शन क्रिया योग प्रशीक्षण शिबीराचे आयोजन केल्यामुळे आम्हि हे ऑनलाईन सुदर्शन क्रिया करू शकलो आहोत. आणि निश्चितच यातुन मानसिक स्वास्थ्य तसेच रोगप्रतीकारक क्षमता वाढते आणि शारिरीक स्वास्थ खुप चांगले राहण्यास मदत तर होतेच शिवाय या शिबीरामध्ये हि सुदर्शन क्रिया म्हणजे श्सासा ची कार्यशाळा पुर्ण शरिरात नवचैतन्य निर्माण करते आणि मनावरील 100% ताणतणाव विसरून जाऊन एक उत्साह व चैतन्यपूर्ण वातावरण आतुन आणि बाहेरून तयार होते आणि पुन्हा जोमाने कार्य करायला एक नविन ऊर्जा मिळते.. सिमेवर लढाई साठी शस्त्रसाठा लागतो तर हा या कोवीड 19 वर मात करण्यासाठीचा ईतर बाबी बरोबर च हा हि या सर्व कर्मचारी वर्गासाठी चा योगाचा आणि श्वासांचा शस्त्रसाठा आहे.. आर्ट ऑफ लिव्हिग च्या माध्यमातून अशा प्रकारची ऑनलाइन योग शिबीराचे आयोजन करून या कोवीड 19 या संसर्गावर मात करण्यासाठी आमची सर्व टिम आणि 4500 योग प्रशीक्षक सदैव तयार आहे याचा आम्हाला अभिमान आहे.
Leave a comment