औरंगाबाद । वार्ताहर
महाराष्ट्र, जून 2020: एचडीएफसी अॅर्गो जनरल विमा कंपनी या भारताच्या खासगी क्षेत्रातील तिसर्या क्रमांकाच्या सर्वांत मोठ्या बिगर जीवन विमा पुरवठा कंपनीला महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामासाठी अहमदनगर, अमरावती,जालना, लातूर, नाशिक, परभणी, सातारा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील कर्जदार आणि विना-कर्जदार शेतकर्यांसाठी रीस्ट्रकचर वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम (आरडब्ल्यूबीसीआयएस) (पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना) लागू करण्यासाठी अधिकृत केले आहे.
पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत (आरडब्ल्यूबीसीआयएस) सर्व उत्पादनांना महाराष्ट्र शासन फलोत्पादन व शेत वनीकरण विभागाने मान्यता दिली आहे. अधिसूचित जिल्ह्यांसाठी योजनेत पेरू, लिंबू, संत्रा, डाळिंब, चिकू आणि गोड संत्र हि पिके समाविष्ट आहे.आरडब्ल्यूबीसीआयएस हंगामी धोक्यांसह,कमी पाऊस पडल्यानंतरचे कव्हर,सतत कोरडा दुष्काळ पडल्यावर कव्हर,आर्द्रता कव्हर यांचा समावेश आहे जे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने अधिसूचित केले आहे.या योजनेंतर्गत अधिसूचित केलेल्या पिकांचे कव्हर मिळवण्याची शेवटची तारीख खाली दिलेल्या तक्त्यात दिली आहे. हक्काच्या रकमेची पूर्तता हवामान निर्देशांक आणि टर्म शीटच्या परिशिष्ट 2 मध्ये अधिसूचित मापदंडाच्या आधारे केली जाईल.
Leave a comment