मा.पा विद्यालय व जि.प शाळेतील उपक्रम
फर्दापूर । वार्ताहर
माणिकराव पालोदकर विद्यालय व जि.प.कें.प्रा शाळा फर्दापूर (ता.सोयगाव) येथे नविन शैक्षणिक सत्रातील शालेय पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना दि.15 सोमवार रोजी सोशल डिस्टन्स पाळून वाटप करण्यात आले यावेळी शाळेत एकाच वेळी गर्दी होवू नये म्हणून उर्वरित विद्यार्थ्याना घरपोच पुस्तक वाटप करण्यात येणार असल्याची माहीती मा.पा.विद्यालयाचे मुख्याध्यापक पि.के.शिंदे यांनी दिली आहे.कोव्हीड 19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागील तीन महीन्यापासून राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळा व शैक्षणिक संस्था जून पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता मात्र कोव्हीड विषाणू संसर्ग वाढत जात असल्याचे दिसून येत असल्याने ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत हा कालावधी वाढविण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान होवू नये या हेतूने विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तक वाटप करुन विद्यार्थ्यांना घरीच ऑनलाईन शिक्षण देण्याचा मानस ठेवून विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तक वाटप करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या होत्या दरम्यान दि.15 सोमवार रोजी फर्दापूर येथील माणिकराव पालोदकर विद्यालयात इयत्ता 5 ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना व जि.प शाळेत इयत्ता 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स राखून व मास्क व सेनेटायझर चा पावर करुन मोफत शालेय पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.पूस्तके घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकाचवेळी शाळेत गर्दी करु नये या हेतूने उर्वरित विद्यार्थ्यांना घरोघरी जावून शालेय पाठ्यपूस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहीती यावेळी मुख्याध्यापक पि.के शिंदे यांनी दिली आहे दरम्यान हे पूस्तक वितरण सोशल डिस्टन्स राखून सुरळीत पार पाडण्यासाठी मा.पा.विद्यालयात शिक्षक के.आर पाटील,एन.टी जाधव,एस.के तायडे,योगिता भोंबे,हरी काकडे तर जि.प.शाळेत डि.टी बलांडे,भालचंद्र चौधरी,स्वप्निता महाजन आदींनी परीश्रम घेतले.
Leave a comment