घोसला गावात पहिली ऑनलाईन चोरी
सोयगाव । वार्ताहर
सोयगावकरांनो फेसबुक वापरत असाल तर सावधान सोयगाव तालुक्यात फेसबुक हॅकर्स अवतरला असून घोसला ता.सोयगाव येथे एकाचे फेसबुक खाते हॅक करून तब्बल 15 हजार रु.ची पहिली ऑनलाईन चोरी झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली असून याप्रकरणी मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे पाटील यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सोयगाव तालुक्यात ऐन खरिपाच्या हंगामात फेसबुक हॅकर्स अवतरला असून सध्या शेतकर्यांना शेतीकामासाठी ऑनलाईन व्यवहार करावे लागत आहे.परंतु प्रत्येक शेतकर्यांचे मोबाईल मध्ये फेसबुक खाते कार्यान्वित करण्यात आले असून यामध्ये शेतकर्यांचा ऑनलाईन व्यवहार सुरु झालेला आहे.त्यासाठी फेसबुक खात्यावर अनेक शेतकर्यांचे बँकखाते फेसबुक सोबत लिंक झालेले असल्याने परदेशातील अवतरलेला फेसबुक हॅकर्स चोरटा सोयगाव तालुक्यातील शेतकर्यांशी मैत्री करून त्यांचे खाते हॅक करून सर्रास ऑनलाईन चोर्या करत आहे.घोसला येथील शेतकरी मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान गव्हांडे यांनी खरिपाच्या पेरण्यांसाठी मित्रपरिवार आणि नातलग यांचेकडून खात्यावर उसनवारी म्हणून पैसे मागवून घेतले असता या चोरट्याने त्यांचे खाते शिताफीने हॅक करून त्यातील पंधरा हजार रु ची चोरी करून त्यांना आणखी एका मोबाईल क्रमांकावरून दम देत असल्याची तक्रार रविवारी सोयगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.सोयगाव तालुक्यात अचानक परदेशातील फेसबुक हॅकर्स अवतरला असल्याने मात्र शेतकर्यांची दाणादाण उडाली आहे.सोयगाव तालुक्यात पहिली ऑनलाईन चोरी घोसला गावात झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून सोयगाव पोलीस या फेसबुक हॅकर्स शोध घेत असून सोपान गव्हांडे यांनी दिलेली तक्रार तातडीने सायबर सेल कडे वर्ग करण्यात आल्याचे सहा.पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी सांगितले.
Leave a comment