औरंगाबाद । वार्ताहर
औरंगपुरा येथील आरोग्य केंद्राचे कर्मचार्यांचा गब्बर अक्शन कमिटीच्या वतिने सम्मानित करण्यात आले आहे.कोरोना या महामारीने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे या पार्श्वभूमी लढा देत आरोग्य कर्मचारी यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. सोमवारी औरंगपुरा येथील आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारीसह कर्मचार्यांचा गब्बर अक्शन कमिटी तर्फे सम्मानित करण्यात आले आहे. गब्बर कमिटीचे अध्यक्ष मकसुद अन्सारी यांनी कोरोना योध्दाने सम्मानित केले आहे.
या आरोग्य केंद्रात तीन वार्ड येतात या तीन ही वार्ड मध्ये गुलमंडी, नारळीबाग, समर्थनगर येथे कोरोना कोव्हिडचे 42 पॉझिटिव्ह पेंशट मिळून आले होते. त्यात 14 पेंशटला डिस्चार्ज करण्यात आले 28 केस अक्टिव्ह आहे. 46 पेंशट निगेटिव्ह,एकूण 88 रूग्ण मिळून आले होते. यात अडीच महिन्यात दररोज आरोग्य केंद्रात रूग्णांची रुटींग चेकअप तपासणी 1820 करण्यात आले. तसेच ई- पासेससाठी फिटनेस प्रमाणापपत्र या आरोग्य केंद्रातर्फे 1590 देण्यात आले असे आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ सविता तांबे यांनी माहिती दिली आहे. यावेळी गब्बर कमिटीचे अध्यक्ष यांनी सांगितले की, कोरोना या महामारीशी खरी लढत येथील डॉक्टर व कर्मचारी करीत आहे. चांगले काम करणार्यांना डॉक्टर असो किंवा कोणतेही खातेचे अधिकारी असो गब्बर अक्शन कमिटी पाठिशी आहे. औरंगाबाद शहरातील खाजगी दवाखाने डॉक्टरांना गब्बर कमिटी तर्फे चेतावनी देण्यात आली आहे. या महामारीच्या काळात खाजगी दवाखाने डॉक्टरांनी बंद केल्याने शहरातील आजारी रूग्णांचे,हाल होत आहे अशावेळी या खाजगी दवाखाने जाणूनबुजून बंद केले आहे. ते तत्काळ चालू करा नसता गब्बर स्टाईलने आम्ही खाजगी दवाखान्यावाल्यांना धडा शिकवू असे मकसुद अन्सारी यांनी सांगितले, यावेळी हफीज अली, इम्रान पठाण, हसन शाह आदींची प्रमुख उपस्थिती होती. आरोग्य केंद्राचे सम्मानित करण्यात आलेले सुभाष पाटील,सुरासे,वर्षा बुरकुळे,अश्विनी परळकर यांना सम्मानित करण्यात आले कोरोना योध्दाने.
Leave a comment