वांगी बुद्रुक व मोढा बुद्रुक रस्त्यावरील पुलाचा अर्धा भाग गेला वाहुन
बोरगाव बाजार । वार्ताहर
वांगी ता,सिल्लोड परिसरात मागील तीन ते चार दिवसांपासून सतत अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नदी नाले तुडुंब भरल्याने शेतबंधारे,पुल,तसेच शेतीचे व शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे,यामध्ये ग्रामीण भागातील रस्त्याचेही मोठ्या प्रमाणात दानादाण झालेले दिसुन येत आहे,तसेच सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील वांगी बुद्रुक फाटा ते वांगी बुद्रुक गावात जाणार्या एक किलोमिटर रस्त्यावरील खडी व डांबर पुर्णपणे वाहुन गेले असुन सदरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डच खड्डे पडले असुन या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात चिखल साचला आहे, यामुळे गावकर्यांना या चिखलातुन पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे तर वाहनधारकांना चिखलातुन गाडी काढतांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे.
वांगी बुद्रुक ते मोढा बुद्रुक या गावांना जोडणारा वांगी बुद्रुक येथील गावाशेजारी असलेल्या पुलाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खचला असुन व पुरात वाहुन गेला आहे मोढा बुद्रुक येथील नागरिक भराडी येण्या जाण्यासाठी या पर्यायी रस्त्याचा वापर करतात,वांगी बुद्रुक येथील शेतकर्यांनासुद्धा पुलाचा अर्धा भाग वाहुन गेल्यामुळे शेतात जाण्यासाठी ञास सहन करावा लागत आहे,जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना वांगी बुद्रुक फाटा ते वांगी बुद्रुक गाव हा एक किलोमिटर डांबर रस्ता तसेच वांगी बुद्रुक व मोढा बुद्रुक या गावांना जोडणारा पुल मंजुर करण्यात यावा अशाप्रकारचे निवेदन ग्रामपंचायतच्या व गावकर्यांच्या वतीने देण्यात येणार असल्याचे सरपंच महेश पाटील व माजी सरपंच चंद्रशेखर साळवे यांनी सांगितले.
Leave a comment