औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1502 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1104 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 130 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 2756 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. राजाबाजार (2), न्यू हनुमान नगर (2), बायजीपुरा(1), खोकडपुरा (2), बांबट नगर, बीड बायपास (2), साई नगर, एन सहा (2), राजमाता हाऊसिंग सोसायटी (1), माया नगर, एन दोन (3), संजय नगर, आकाशवाणी परिसर (1), रशीदपुरा (2), यशोधरा कॉलनी (2), सिडको पोलिस स्टेशन परिसर (1), सिल्क मील कॉलनी (1), किराडपुरा (1), पीरबाजार (2), शहानूरवाडी (2), गजानन मंदिर परिसर, गारखेडा (2), अहिल्या नगर, मुकुंदवाडी (1), जहाँगीर कॉलनी, हर्सुल (1), कैलास नगर (2), समर्थ नगर (1), छावणी परिसर (4), गौतम नगर (1), गुलमंडी (5), भाग्य नगर (1), गजानन नगर, गल्ली नं नऊ (4), मंजुरपुरा (1), मदनी चौक (1), रांजणगाव (1), बेगमपुरा (1), रेहमानिया कॉलनी (2), काली मस्जिद परिसर (1), क्रांती चौक परिसर (1), विश्रांती नगर (1), कन्नड (5), जिल्हा परिषद परिसर (4), देवगिरी नगर, सिडको वाळूज (1), बजाज नगर (15), राम नगर (1), देवगिरी कॉलनी सिडको (4), वडगाव कोल्हाटी (2), स्नेहांकित हाऊसिंग सोसायटी (1), नक्षत्र वाडी (2), बकलवाल नगर, वाळूज (2), सलामपूर, पंढरपूर (11), वलदगाव (1), साई समृद्धी नगर कमलापूर (2), अज्वा नगर (1), फुले नगर, पंढरपूर (4), गणेश नगर, पंढरपूर (1), वाळूजगाव, ता. गंगापूर (1), शाहू नगर, सिल्लोड (1), मुस्तफा पार्क, वैजापूर (1), एन नऊ शिवाजी नगर, सिडको (1), सहकार नगर, न्यू उस्मानपुरा (1), एन दोन, सिडको, मुकुंदवाडी (1), कटकट गेट (2), दुधड (1), अबरार कॉलनी (1), अजब नगर (1),कोहिनूर कॉलनी (1), त्रिमूर्ती चौक (1), अन्य (2) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 44 स्त्री व 86 पुरूष रुग्णांचा समावेश आहे. भागातील कोरोनाबाधित आहेत.
आतापर्यंत 1502 जण कोरोनामुक्त
मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1502 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.
घाटीत दोन, खासगीत पाच कोरोनाबाधिताचा मृत्यू
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील मयूर नगरातील 71 वर्षीय पुरूष रुग्णाचा 13 जून रोजी सकाळी 11.30 वाजता, रेहमानिया कॉलनीतील 50 वर्षीय पुरूष रुग्णाचा संध्याकाळी सात वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच शहरातील एका खासगी रुग्णालयात 13 जून रोजी रोशन गेट, बारी कॉलनी येथील 62 वर्षीय स्त्री रुग्णाचा रात्री 10.45 वा, तर जहांगीर कॉलनीतील 55 वर्षीय पुरूष रुग्णाचा 14 जून रोजी सकाळी 10.30 वाजता आणि बारी कॉलनीतील 52 वर्षीय पुरूष रुग्णाचा सकाळी 10.55 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य एका खासगी रुग्णालयात सिडकोतील एन सहामधील साई नगरातील 58 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शहरातील अन्य एका रुग्णालयात रेल्वे स्टेशन परिसरातील सिल्क मिल कॉलनीतील 52 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित रुग्णाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 111, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 38, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 150 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
Leave a comment