अनर्थ टळला; लेणी क्रमांक 20 व 21 समोर कोसळली दरड, पूल नेस्तनाबूत
फर्दापूर । सागर भुजबळ
जगप्रसिद्ध अजिंठालेणीत सतत सुरु असलेल्या पावसामुळे मध्य रात्रीच्या सुमारास लॅन्ड स्लाईडिंग होवून डोंगर माथ्यावरील भलीमोठी दरड लेणी क्रमांक 20 व 21 समोरील लोखंडी पुलावर कोसळून सदरील पुल नेस्तनाबूत झाला सुदैवाने ही घटना गुरुवारी मध्यरात्री रात्रीच्या सुमारास घडल्याने व लॉक डाऊन मुळे लेणी बंद असल्याने या अपघातात शासकीय मालमत्तेच्या नूकसाना व्यतिरिक्त कोणतीही हाणी झाली नाही.मात्र अधिकार्यांची गैरहजेरी व अपूर्ण मनुष्य बळामुळे घटनेच्या दोन दिवसानंतर ही कोसळलेल्या दरडी चे अवशेष घटनास्थळावरून अद्यापपर्यंत हलविण्यात आलेले नसल्याने या गंभीर घटने कडे भारतीय पुरातत्त्व विभाग अक्षम्य दुर्लक्ष करतांना दिसत असल्याचे जाणवत आहे.
जागतिक वारसा असलेली जगप्रसिद्ध अजिंठालेणी डोंगराच्या मधोमध कोरली गेलेली असल्याने दरवर्षी पावसाळी हंगामात लेणी परीसरात लॅन्ड स्लाईडिंग होवून छोट्या-मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटना नेहमीच घडतांना दिसतात अनेक वर्षापासून पावसाळी हंगामात लेणी परीसरात लॅन्ड स्लाईडिंग होवून दरडी व दगड कोसळण्या च्या लहान मोठ्या घटना घडतांना दिसत असल्या तरी भारतीय पुरातत्त्व विभागाने या घटना रोखण्यासाठी अद्यापपर्यंत कोणतीही ठोस अशी उपाययोजना लेणी परिसरात केलेली दिसत नसल्याने भविष्यात अश्या एखाद्या घटनेमुळे या ठिकाणी एखादी भीषण दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान मागील दोन दिवसात फर्दापूर अजिंठालेणी परीसरात वादळी वार्यासह जोरदार पावसाने चांगलाच तांडव केला या वादळी पावसाचा तडाखा मागील तीन महिन्यापासून लॉक डाऊन मुळे बंद असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठालेणीस गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास बसल्याचे दिसून आले आहे गुरुवारी रात्रीच्या मुसळधार पावसाने अजिंठालेणीतील लेणी क्रमांक 20 व 21 च्या डोंगर माथ्यावरील डिसूळ झालेल्या जमिनीवर लॅण्ड स्लाइडिंग होवून डोंगरातील भलीमोठी दरड दगड-माती सह लेणीतील लोखंडी पुलावर येवून आदळली डोंगर माथ्यावरून लेणीत कोसळणार्या दरडीचा वेग व प्रहार इतका जबरदस्त होता की यात लेणी क्रमांक 20 व 21 ला जोडणारा पूल पूर्णपणे नेस्तनाबूत होवून रस्ता बंद झाला सुदैवाने लॉक डाऊन मुळे अजिंठालेणी बंद असल्याने या घटनेत एक मोठा अनर्थ टळल्याचे दिसून आले आहे.दरम्यान दरड कोसळून दोन दिवसाचा काळ उलटून गेला असला तरी अधिकार्यांची अनुपस्थिती व अपूर्ण मनूष्य बळामुळे पुरातत्व विभागाने अद्याप पर्यंत घटनास्थळा वरुन दरडीतील दगडाचे अवशेष अद्यापपर्यंत हलविले नसल्याने या गंभीर प्रकारा कडे भारतीय पुरातत्त्व विभाग अक्षम्य दुर्लक्ष करतांना दिसत आहे लॉक डाऊन मूळे अजिंठालेणी बंद असल्याने सदरील घटनेची माहिती प्रसार माध्यमांना उशीराने प्राप्त झाली आहे.
Leave a comment