औरंगाबाद - वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1451 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1032 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 91 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 2626 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. इंदिरा नगर (1), हिना नगर (1), बेगमपुरा (1), सिडको (1), चिकलठाणा (2), उस्मानपुरा (1), हिमायत बाग (1), समता नगर (2), संजय नगर, बायजीपुरा (1), महेश नगर (1), देवगाव रंगारी (1), एन अकरा, हडको (1), एन सहा सिडको (2), मयूर नगर, एन अकरा (1), बायजीपुरा गल्ली नं. सत्तावीस (3), जुना मोंढा गवळीपुरा (1), माया नगर, एन दोन, सिडको (1), शाहू नगर, सिल्लोड (1), हडको एन अकरा (1), करीम कॉलनी (1), कोहिनूर कॉलनी (1), जवाहर कॉलनी (2), गजानन कॉलनी (1), राहुल नगर (1), बिस्मल्लिा कॉलनी (1), शहागंज, मंजूरपुरा (1), हडको एन अकरा (1), चिंचोली (1), उस्मानपुरा (1), गारखेडा (1), बायजीपुरा (1), वेदांत नगर (1), पद्मपुरा (1), मथुरा नगर (1), रोशन गेट (1), सिल्म मील कॉलनी (1), गादिया विहार (3), एन नऊ सिडको (5), उत्तम नगर (1), बुद्ध विहार (1), न्यू हनुमान नगर (1), बन्सीलाल नगर (1), बेगमपुरा (4), जयभीम नगर (1), शहागंज (2), रेहमानिया कॉलनी (1), भवानी नगर (1), लक्ष्मी नगर (2), एन दोन सिडको (2), सुंदरवाडी (4), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी (1), बजाज नगर (2), सलामपूर,पंढरपूर परिसर (2), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (1), गणेश नगर, पंढरपूर (2), फतेहमैदान , फुलंब्री (6), फतियाबाद, गंगापूर (1), शिवराई, गंगापूर (1), मुस्तया पार्क, वैजापूर (1), पानचक्की रोड (1), रोहिदासपुरा (1), तुर्काबाद (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 28 महिला आणि 63 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत 1451 जण कोरोनामुक्त
मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1451 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.
घाटीत सात, खासगीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडगाव येथील कोरोनाबाधित असलेल्या 41 वर्षीय पुरूष रुग्णाचा 12 जून रोजी रात्री दहा वाजता, तर 13 जून रोजी मध्यरात्री 12.15 वाजता औरंगाबाद शहरातील खोकडपुरा येथील 78 वर्षीय स्त्री, पहाटे 2.50 वाजता कैलास नगरातील 43 वर्षीय पुरूष, पहाटे 4.15 वाजता राम नगर एन दोन येथील 70 वर्षीय स्त्री, सकाळी 6.30 वाजता सुभेदारी विश्राम गृह परिसरातील 42 वर्षीय स्त्री, सकाळी 7.50 वाजता रेहमानिया कॉलनीतील 50 वर्षीय स्त्री, दुपारी 12.30 वाजता संभाजी कॉलनीतील 54 वर्षीय पुरूष या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शहरातील एका खासगी रुग्णालयात 12 जून रोजी रात्री 9.30 वाजता ज्ञानेश्वर नगर, गारखेडा परिसर येथील 72 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 109, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 33, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 143 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
Leave a comment