औरंगाबाद । वार्ताहर
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जगातील खास करून अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया या खंडात खेळला जाणारा इव्हेंट जो की प्रतिष्टीत आयन मॅन क्लबने यावर्षी व्हर्टूअल आयनमॅनहा इव्हेंट सर्वासाठी खुला केला यामध्ये जगातील जास्तीत जास्त देशांनी सहभाग घेतला यामध्ये प्रत्येक आठवड्यातनुसार सोशल डिस्टन्सिंग च्या अटीनुसार वेगवेगळं अंतर धावणे तसेच सायकलिंग करणे यात फक्त जलतरण वगळण्यात आले व याच्या वेगवेगळ्या सिरीज प्रत्येक आठवड्यानुसार तयार करण्यात आल्या जेणेकरून प्रत्येकाला सहभाग घेता येईल आणि आरोग्याच्या बाबतीत सकारात्मकता येईल अशा पद्धतीने तयार केले
या मध्ये तठ-10 सिरीज मधील 3 किलोमीटर धावणे, 40 किलोमीटर सायकलिंग, 10 किलोमीटर धावणे, हे अंतर आणि तठ -11 मधील 1.5 किमी धावणे, 20 किमी सायकलिंग आणि पुन्हा 5 किमी धावणे असे खडतर चॅलेंज औरंगाबादच्या श्रीनिवास मोतीयेळे आणि निखिल पवार यांनी पूर्ण केले. निखिल पवार यांनी तठ 11 चे अंतर 1 तास 32 मिनिट तर श्रीनिवास मोतीयेळे यांनी हे अंतर 2 तास 2 मिनिट या वेळे मध्ये पूर्ण केले. हा परफॉर्मन्स काउन्ट करण्यासाठी दोघानीं रनकिपर या ऍप ची मदत घेतली तसेच या इव्हेंट नुसार जागतिक क्रमवारी आणि भारतीय क्रमवारी ची देखील दखल घेतली जाते. हा इव्हेंट पूर्ण करण्यासाठी ट्रायथलोन संघटनेचे अभय देशमुख आणि नगर जिल्हाचे प्रसिद्ध सायकलपटू भारत झंवर यांचं संपूर्ण तांत्रिक आणि मोलाचे मार्गदर्शन लाभलं. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठीची प्रेरणा आयन मॅन नितीन घोरपडे, निकेत दलाल, डॉ प्रफुल जटाळे, यांच्याकडून मिळाली असे या प्रसंगी निखिल आणि श्रीनिवास ने सांगितले. या पूर्वी अतुल जोशी, उन्मेष मारवाडे, निखिल काचेवार, गोपाळ पवार यांनी देखील ही स्पर्धा यशस्वी केली होती. हे यश प्राप्त केल्या बद्दल अग्रसेन विद्या मंदिरचे सचिव अॅड.मुकेश जी गोयंका, जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे पंकज भारसाकळे,सायकल संघटनेचे चरणजीत सिंग, शिव छत्रपती पुरस्कार विजेते डॉ.उदय डोंगरे, डॉ.संदीप जगताप, रुस्तम तुपे, अशोक काळे, मुकेश बाशा, राजेश पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.
Leave a comment