लागला शेतीमशागती व पेरणीच्या कामाला

बोरगांव बाजार । वार्ताहर

बोरगांव बाजार व परिसरात मे व जुन महीन्यात जास्त तापमान व उकड्यामुळे नागरिक परेशान झाले होते व बुधवारी- गुरूवारी सतत दोन दिवस राञी या हंगामातील पहील्या जोरदार पडलेल्या पाऊसमुळे बळीराजा सुखावला व लागला शेतीमशागती व पेरणीच्या कामाला.

बोरगांव बाजार व सावखेडा,कोटनांद्रा, सोनाप्पावाडी, खातखेडा,बोरगांव सारवाणी,म्हसला , बोरगाववाडीसह मे व जुन महीन्यात जास्त तापमान व उकड्यामुळे व सोबत लाँकडाऊन आसल्यामुळे घराबाहेर पडता येत नसल्यामुळे नागरिक परेशान झाले होते,या नतंर जुनच्या दुसर्‍या आढवड्यात म्हणजेच बुधवारी-गुरूवारी राञी दोन दिवस राञीच्या दरम्यान विजेच्या कडकडात व ढगाच्या गडगडाटासह पाऊसाची जोरदार सुरूवात झाली, व या हंगामातील पहीलाच पाऊसामध्ये परिसरातील अनेक लहान मोठ्या नदी,नाले-ओढ्याना पुर आले, तर काही ठिकाणचे तलाव साधारण 20 ते 25 टक्के तलाव भरले तर अनेक ढिकाणी शेताचे बांध-बंधारे वाहुन गेले आहे,या दरम्यान बुधवारी राञी पडलेल्या पाऊसामुळे बळीराजा चांगलाच सुखावलेला दिसुन आला व गुरूवार व शुक्रवारला सकाळी अनेक शेतकर्‍यांनी आपली शेती मशागत करण्याच्या कामात व्यस्त दिसुन आले तर काही ढिकाणी शेतकर्‍यांनी पेरणी करण्यास सुरूवात केली आहे,व या पाऊसामुळे नागरिकांना उकड्या पासुन मुक्ती व वातावरणातील गारव्यामुळे नागरिकातुन समाधान व्यक्त होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.